News18 Lokmat

IPL 2019 : नेपाळच्या या गोलंदाजानं केला अनोखा विक्रम, टाकलं बुमबुम आफ्रिदीला मागे

नेपाळच्या या 18 वर्षीय गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्या फलंदाजांना तंबूत पाठवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 01:25 PM IST

IPL 2019 : नेपाळच्या या गोलंदाजानं केला अनोखा विक्रम, टाकलं बुमबुम आफ्रिदीला मागे

मोहाली, 2 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे ज्वर जसे दिवसेंदिवस वाढत आहे, तसे रोज नवनवीन विक्रमही घडत आहेत. पंजाब आणि दिल्ली यांच्यात झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात पंजाबनं बाजी मारली. या सामन्याचं वैशिष्ट्य ठरली ती सॅम कुरननं घेतलेली हॅटट्रिक.

पण, दिल्ली कॅपिटल्स या संघाचे प्रतिनिधित्व करणारा नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिछाने यानेही एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं चक्क पाकिस्तानच्या बुमबुम आफ्रिदीलाच मागे टाकले आहे.पंजाबविरुद्धच्या सामन्यात संदीपने दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि 2019 मध्ये त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 27 विकेट घेण्याचा पराक्रम केला. या कामगिरीसह त्यानं पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि बांगलादेशचा शकिब अल हसन या दिग्गजांना मागे टाकले आहे. संदीपनंतर यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत आफ्रिदीचा क्रमांक येतो. त्याने 2019 मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या रशीद खानच्या नावावर 25 आणि शकिबच्या नावावर 24 विकेट्स आहेत.


SPECIAL REPORT: डिपॉजिट भरतेवेळी 'या' महाशयांनी आणली चक्क 25 हजारांची चिल्लर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 2, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...