मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Road Safety World Series: 53व्या वर्षी गाजवतोय क्रिकेटचं मैदान, श्रीलंकेच्या महान खेळाडूचा ‘ग्रेट कारनामा’

Road Safety World Series: 53व्या वर्षी गाजवतोय क्रिकेटचं मैदान, श्रीलंकेच्या महान खेळाडूचा ‘ग्रेट कारनामा’

श्रीलंका लीजंड्स वि. इंग्लंड लीजंड्स सामना

श्रीलंका लीजंड्स वि. इंग्लंड लीजंड्स सामना

Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये आज श्रीलंकेचा सामना झाला तो इंग्लंडशी. पण पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडचा डाव सनथ जयसूर्याच्या फिरकीसमोर पत्त्यांसारखा कोसळला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

कानपूर, 23 सप्टेंबर: भारतात सध्या रोड सेफ्टी वर्ल्ज सीरीज टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवून निवृत्त झालेले अनेक महान खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. भारतासह आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पण आज झालेल्या श्रीलंका आणि इंग्लंडमधल्या सामन्यात 90चं दशक आपल्या आक्रमक फलंदाजीनं गाजवलेल्या एका महान फलंदाजानं आज गोलंदाजीत कमाल केली. वयाच्या 53व्या वर्षी त्यानं इंग्लंडच्या लीजंड्सची दाणादाण उडवली. त्या महान खेळाडूचं नाव आहे सनथ जयसूर्या.

जयसूर्याची जादूई फिरकी

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये आज श्रीलंकेचा सामना झाला तो इंग्लंडशी. श्रीलंकेन या सामन्यात टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंग दिली. पण सनथ जयसूर्याच्या फिरकीसमोर इंग्लंडचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. जयसूर्यानं आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये दोन ओव्हर मेडन टाकल्या. त्यात केवळ 3 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. जयसूर्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंड लीजंड्सचा डाव 19 षटकात अवघ्या 78 धावात आटोपला.

पहिल्या सामन्यात दिलशानचं शतक

या स्पर्धेतला श्रीलंकेचा हा दुसरा सामना होता. सलामीच्या सामन्यात तिलकरन्ने दिलशानचं नाबाद शतक आणि दिलशान मुनावीराच्या नाबाद 95 धावाच्या खेळीमुळे श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला 38 धावांनी हरवलं. कर्णधार दिलशाननं 56 बॉलमध्ये 107 धावा फटकावल्या होत्या.

इंडिया लीजंड्सची विजयी सलामी

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लीजंड्सनही या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. भारतीय संघानं त्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 61 धावांनी हरवलं.

First published:

Tags: Sports, T20 cricket