S M L
Football World Cup 2018

'समित राहुल द्रविड'ची शालेय क्रिकेट स्पर्धेत 150 धावांची तुफानी खेळी

कर्नाटक क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत ज्यूनिअर 'द वॉल' समितनं शानदार शतक तडकावलं.

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2018 09:47 AM IST

'समित राहुल द्रविड'ची शालेय क्रिकेट स्पर्धेत 150 धावांची तुफानी खेळी

11 जानेवारी : राहुल द्रविडचा मुलगा समितनं शालेय क्रिकट स्पर्धेत 150 धावांची तुफानी खेळी केली आहे. कर्नाटक क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत ज्यूनिअर 'द वॉल' समितनं शानदार शतक तडकावलं. त्यामुळे सगळीकडूनच त्याचं कौतुक होत आहे.

माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूल आणि विवेकानंद स्कूल या संघांमध्ये हा सामना झाला. द्रविडचा मुलगा समितसोबतच भारताचा माजी गोलंदाज सुनील जोशीचा मुलगा आर्यननंही होता. या सामन्यात त्यानं दीडशतकी खेळी केली आहे.

समित आणि आर्यनच्या फटकेबाजीच्या जोरावर माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलच्या संघानं 50 षटकात 5 बाद 500 धावा केल्या. तर विवेकानंद स्कूलला 88 धावांत गुंडाळलं. या अगोदर 14 वर्षांखालील सामन्यातही समितनं शतक झळकावलं होतं. त्यामुळे हे छोटे क्रिकेट पट्टू आता खऱ्या अर्थानं मैदानात उतरले असं म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close