मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सोशल मीडियावरून कंगनाला सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफान पठाणने केलं असं काम की सगळीकडून होतंय कौतुक

सोशल मीडियावरून कंगनाला सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफान पठाणने केलं असं काम की सगळीकडून होतंय कौतुक

इस्रायल आणि पॅलस्टाइनच्या मुद्द्यावरून कंगना रणौतला सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफानने आता असं काम केलं आहे की, सगळे त्याचं कौतुक करत आहेत.

इस्रायल आणि पॅलस्टाइनच्या मुद्द्यावरून कंगना रणौतला सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफानने आता असं काम केलं आहे की, सगळे त्याचं कौतुक करत आहेत.

इस्रायल आणि पॅलस्टाइनच्या मुद्द्यावरून कंगना रणौतला सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफानने आता असं काम केलं आहे की, सगळे त्याचं कौतुक करत आहेत.

नवी दिल्ली, 15 मे: कोरोनाच्या(Corona)कठीण काळात काही मोजके अपवाद वगळता समाजातल्या सर्वच घटकांनामदतीची गरज भासते आहे. हे संकट भयावह आहे आणि त्याचा फटका सर्वचक्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे त्या संकटाने अधिकच रौद्र रूप धारण केलंआहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या अनेक स्तरांतले लोक मदतीसाठीही पुढे येतआहेत. अनेक सेलेब्रिटींनीही वेगवेगळ्या प्रकारची मदत लोकांसाठी देऊ केलीआहे. त्यात क्रिकेटपटूंचाही (Cricketiers)समावेश आहे.

माजी भारतीयक्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan)आणि त्याचा भाऊ युसुफ पठाण (Yusuf Pathan)यांनीही अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे. या कठीण काळातपरिस्थितीशी झुंज देत असलेल्या लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी हरतऱ्हेचेप्रयत्न हे खेळाडू करत आहेत.

सर्वसामान्य नागरिक,तसंच फ्रंटलाइनवॉरियर्स (Frontline Warriors)अर्थात कोरोना योद्ध्यांसाठीही हे पठाण बंधूमदत करत आहेत. ही मदत आणखी वाढवण्यासाठी आता इरफान पठाणने एक मोठा निर्णयघेतला आहे. सोशल मीडियावरून आपल्याला मिळणारी सारी कमाई दान करण्याचानिर्णय भारताच्या या माजी अष्टपैलू खेळाडूने घेतला आहे.

8 वर्षांच्या मुलानं स्टम्पनं मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट, VIDEO VIRAL

इरफान आणियुसुफ पठाण यांनी गरजूंना अन्नधान्याचं दान केलं असून,आतापर्यंत90हजारकुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. त्याशिवाय पठाण क्रिकेट अॅकॅडमीने(Pathan Cricket Academy)दक्षिण दिल्लीतल्या कोरोनाबाधित लोकांना मोफतजेवणही उपलब्ध करून दिलं होतं.

एवढंच नव्हे,तर या पठाण बंधूंचेवडील महमूद खान पठाण (Mahmood Khan Pathan)हेदेखील मदतकार्यात मागे नाहीत.त्यांनी आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बडोद्यात कोविड रुग्णांनाजेवण उपलब्ध केलं आहे.

गेल्याच आठवड्यात अनुष्का शर्मा आणिविराट कोहली या दाम्पत्यानेही कोरोनाग्रस्तांसाठी सात दिवसांत सात कोटीरुपये उभे करण्याची घोषणा केली होती. त्यांनी त्यासाठी केट्टो याक्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मच्या साह्याने सोशल मीडियावर#InThisTogetherहाउपक्रम सुरू केला होता. त्यात या दाम्पत्याने दोन कोटी रुपये स्वतः दिलेहोते. लोकांचा या मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून त्यांनी ही रक्कम11कोटींवर न्यायचा निर्णय जाहीर केला. या उपक्रमातून गोळा झालेला निधीACT Grantsया संस्थेकडे दिला जाणार आहे.

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या वर्गमैत्रीणी; शाळेतील जुने फोटो व्हायरल

ही संस्था या उपक्रमाचीइम्प्लिमेंटेशन पार्टनर (Implementation Partner)म्हणून काम करणार आहे. हीसंस्था ऑक्सिजन पुरवठा,वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्धता,लसीकरण जनजागृती,टेलिमेडिसीन फॅसिलिटीज आदी प्रकारचं कार्य करत आहे. विराट-अनुष्काच्याउपक्रमातून गोळा झालेला निधी या संस्थेच्या कार्यासाठी दिला जाणार आहे.

First published:

Tags: Cricket, Social media