जागतिक कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिक आणि विनिशा फोगट यांचा पराभव

जागतिक कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिक आणि विनिशा फोगट यांचा पराभव

साक्षी मलिक पहिल्याच फेरीत पराभूत झालीये. ६० किलो गटात जर्मनीच्या लुईसा निमेशनं साक्षीचा १-३ असा पराभव केला. तर ४८ किलो गटात विनिशा फोगटचा अमेरिकेच्या व्हिक्टोरिया अँथोनीनं सहज पराभव केला.

  • Share this:

25 आॅगस्ट : जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत  भारत फक्त पराभवच बघतोय. ३ दिवस कुस्तीपटूंच्या निराशाजनक कामगिरीनंतर साक्षी मलिक आणि विनिशा फोगटकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या. पण दोघींनीही निराशा केलाय.

साक्षी मलिक पहिल्याच फेरीत पराभूत झालीये. ६० किलो गटात जर्मनीच्या लुईसा निमेशनं साक्षीचा १-३ असा पराभव केला. तर ४८ किलो गटात विनिशा फोगटचा अमेरिकेच्या व्हिक्टोरिया अँथोनीनं सहज पराभव केला. ५३ किलो वजनी गटात शितल तोमर आणि ६९ किलो वजनी गटात नवजोत कौरलाही पराभव स्वीकारावा लागलाय.

आतापर्यंत भारतीय कुस्तीपटूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहलीये. भारताची पदकाची शेवटची आशा आता बजरंग पुनीया आणि संदीप तोमर यांच्यावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading