Home /News /sport /

साक्षीने शेअर केला धोनीसोबतचा फोटो, चाहत्यांना दिल्या New Year च्या शुभेच्छा

साक्षीने शेअर केला धोनीसोबतचा फोटो, चाहत्यांना दिल्या New Year च्या शुभेच्छा

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबतचा फोटो शेअर करत त्याची पत्नी साक्षीने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  मुंबई, 01 जानेवारी: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन आपल्या परिवारासोबत केलं आहे. साक्षी धोनीने मुलगी माहीसोबत आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून नव्या वर्षाच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.याआधी हार्दीक पांड्याने आपल्या अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. साक्षीने महेंद्रसिंग सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत 2020 हे वर्ष या माणसासोबत असा इशारा करणारं कॅप्शन लिहून नव वर्ष साजरं केलं आहे. साक्षीच्या या फोटोचा संकेत आहे की महेंद्रसिंग धोनी 2020मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल़्डकपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला होता. या मधल्या काळात धोनीने आपला वेळ मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत घालवला आहे.
   
  View this post on Instagram
   

  2020 with this man ❤️ !

  A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

  2020मध्ये महेंद्रसिंग धोनी भारताकडून खेळणार असल्याचे संकेत दिले जात आहे. न्यूझिलंड दौऱ्यादरम्यान विकेटकीपिंगची जबाबदारी धोनीवर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतील लोकेशन रांचीमधील असल्याचं सांगितलं जात आहे. रांचीमधील फार्महाऊसवर हा फोटो काढला असावा असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. रांची विमानतळावरील त्यांच्या व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी धोनीच्या कमबॅकवर आपली प्रतिक्रिया दिली होती. इंडिया प्रीमियर लीग आयपीएल धोनीसाठी महत्त्वाचं आहे. आयपीएलमधील त्याची खेळी वर्ल्डकपच्या दृष्टीनं महत्त्वाची असणार आहे. धोनी आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप टीममध्ये सामिल होणार की नाही हे त्यावरून ठरवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागले तेव्हाच आपल्याला धोनी वर्ल्डकपसाठी खेळणार की नाही याचं उत्तर मिळू शकतं अशी प्रतिक्रिया अनिल कुंबळे यांनी दिली आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Mahendrasing Dhoni, Sports

  पुढील बातम्या