मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /माही 13 वर्षात किती बदलला पाहा, साक्षी धोनीनं शेअर केला जुना PHOTO

माही 13 वर्षात किती बदलला पाहा, साक्षी धोनीनं शेअर केला जुना PHOTO

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडल पेजवरील व्हिडीओमध्ये साक्षीने म्हटले आहे की धोनी सहसा सर्व गोष्टींमध्ये शांत असतो, मात्र कॅप्टन कूलला भडकविणारा तो एकमेव माणूस आहे. साक्षी म्हणाली की, फक्त मीच धोनीला भडकवू किंवा त्रास देऊ शकते, कारण मी त्याच्या सर्वात जवळ आहे. तो माझ्यावरही रागवतो, मात्र त्याचा मला त्रास होत नाही. (Sakshi Dhoni/Instagram)

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडल पेजवरील व्हिडीओमध्ये साक्षीने म्हटले आहे की धोनी सहसा सर्व गोष्टींमध्ये शांत असतो, मात्र कॅप्टन कूलला भडकविणारा तो एकमेव माणूस आहे. साक्षी म्हणाली की, फक्त मीच धोनीला भडकवू किंवा त्रास देऊ शकते, कारण मी त्याच्या सर्वात जवळ आहे. तो माझ्यावरही रागवतो, मात्र त्याचा मला त्रास होत नाही. (Sakshi Dhoni/Instagram)

महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी यांना एक आदर्श सेलिब्रिटी कपल मानलं जातं. साक्षी सतत त्यांच्या भुतकाळातील प्रेमाचे क्षण शेअर करत असते.

मुंबई, 11 जानेवारी : लोकप्रिय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सोशल मीडियावर (social media) तसा खूप सक्रिय नसतो. याउलट त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) मात्र विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कमालीची सक्रिय असते.

साक्षी धोनी इन्स्टाग्रामवर (Instagram) सतत फोटो (photo) आणि व्हिडीओ (video) शेअर करत असते. साक्षीनं 10 जानेवारी 2012 चे दोन फोटोज पोस्ट केले आहेत. दोन्ही फोटोमध्ये साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी दिसतात. दोन्ही फोटोमध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. नीट निरखून पाहिलं तर दिसेल, की दोन फोटोंमध्ये तब्बल 13 वर्षांचं अंतर आहे.

पहिला फोटो 2008 सालचा आहे. दुसरा फोटो आता काही काळापुर्वी काढलेला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये साक्षीनं लिहिलंय, '2008... आणि त्यानंतर अनेक वर्षांनी' साक्षीनं या फोटोला timeaftertime आणि flashback वरसुद्धा शेअर केलं आहे. वर्ष 2008 मध्ये साक्षी आणि धोनीचं लग्न झालं नव्हतं. दोघं 4 जुलै 2010 ला डेहराडून इथं लग्नबंधनात बांधले गेले.

धोनीनं 2004 मध्ये मँचेस्टरमध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. धोनीनं पुढच्या वर्षी 2005 मध्ये चेन्नईमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या मॅचमधून टेस्टमधील करियर सुरू केलं. 1 डिसेंबर 2006 ला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळत धोनीनं टी 20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.

साक्षीची ही पोस्ट थोड्याच वेळात व्हायरल झाली. एका तासातच पोस्टला जवळपास 3 लाख लोकांनी लाईक केलं. तीन हजारांहून जास्त कमेंट्सही तिथं आल्या. फोटो लाईक करणाऱ्यांमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. साक्षीनं याआधी 30 डिसेंबरलाही असाच एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला होता. त्यात साक्षी आणि धोनी अनेक लोकांसह डिनर करत होते.

First published:

Tags: Instagram, MS Dhoni, Sakshi dhoni