सायना- पी.गोपीचंद पुन्हा एकत्र काम करणार

सायना- पी.गोपीचंद पुन्हा एकत्र काम करणार

सायना-गोपिचंद जोडीनं भारताला बॅडमिंटनमध्ये मोठं यश मिळवून दिलं होतं.

  • Share this:

हैद्राबाद,05 सप्टेंबर: सायना नेहवाल आणि प्रशिक्षक गोपिचंद ही गुरु-शिष्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र येते. प्रशिक्षणासाठी पुन्हा एकदा हैद्राबादला परतत असल्याचं सायनानं ट्विटरद्वारे सांगितलं.

हैद्राबादच्या गोपिचंद अॅकॅडमीमध्ये सायना प्रशिक्षण घेणार आहे. सायना-गोपिचंद जोडीनं भारताला बॅडमिंटनमध्ये मोठं यश मिळवून दिलं होतं. गोपिचंदच्या प्रशिक्षणाखालीचं सायनानं पहिलं ऑलिम्पिक पदकही पटकावलं होतं. २०१४ मध्ये सायनानं हैद्राबाद सोडून, विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंगलोरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली होती.विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायनानं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवंल, ऑल इंग्लंड स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.

आता गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायना पुन्हा ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 01:29 PM IST

ताज्या बातम्या