Home /News /sport /

भाजप प्रवेशानंतर VOGUE मुळे चर्चेत, सायनाचा स्टायलिश अवतार झळकला कव्हर पेजवर

भाजप प्रवेशानंतर VOGUE मुळे चर्चेत, सायनाचा स्टायलिश अवतार झळकला कव्हर पेजवर

‘वोग इंडिया’ (Vogue India) मॅक्झिनच्या फेब्रुवारीच्या अंकाच्या कव्हर पेजवर सायना नेहवाल अनोख्या अंदाजात दिसत आहे.

    मुंबई, 04 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या फॅन्ससोबत सर्वच भारतीयांना आश्चर्याचा धक्का देणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वोग (Vogue) मासिकाच्या कव्हर पेजवर स्टायलिश अवतारात सायना झळकली आहे. वोग मॅक्झिनने आपल्या ‘वोग इंडिया’ (Vogue India) या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची घोषणा केली आहे. यावेळी ‘वोग इंडिया’कडून मॅक्झिनच्या कव्हर पेजचा फोटोही Tweet करण्यात आला आहे. कव्हर पेजच्या या फोटोमध्ये सायनाचा एक वेगळाच अंदाज दिसून येत आहे. अनेकदा अप्रत्यक्षरीत्या केंद्राच्या धोरणांचं समर्थन करणाऱ्या सायना नेहवालने अखेर 29 जानेवारी रोजी भाजपाचं कमळ हाती घेतलं. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात सायनानं भाजपामध्ये प्रवेश केला. राजकीय कोर्टवर सायनानं एन्ट्री केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावेळी अनेकांनी तिला ट्रोलही केलं. दरम्यान, आता सायना पुन्हा चर्चेत आली आहे ती, वोग मॅक्झिनच्या कव्हर पेजवर झळकल्याने... वोग इंडियाच्या फेब्रुवारी, 2020च्या अंकाच्या कव्हर पेजवर सायना नेहवाल झळकली आहे. या कव्हर पेजमध्ये सायना काहीशी कूल अंदाजात दिसत आहे. सायनाच्या हेअर आणि मेकपसाठी मितेश रजानी यांनी मेहनत घेतली आहे तर, कव्हरपेजसाठी फ्रान्सेस्को यांनी फोटोग्राफी केली आहे. ‘Breaking records and creating history’ म्हणत वोग इंडियानं आपली फेब्रुवारी, 2020 अंकाची कव्हर स्टार जाहीर केली आहे.  तर, कव्हर पेजवर Raises Her Game असंही म्हटलं आहे. सायना नेहवालने याआधी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पिअनशिप दरम्यान, आपण वोग इंडियाच्या कव्हर पेजवर येणार असल्याची चाहूल दिली होती. दरम्यान, सायना नेहवालनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वोग इंडियाच्या कव्हर पेजचा फोटो शेअर केला आहे. सायना नेहवालने याआधीही फेमिना इंडियासाठी फोटोशूट केलं होतं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंसोबत तिने फोटोशूट केला होता. त्यावेळीही तिनं आपल्या फॅन्ससोबत हे फोटो शेअर केले होते.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: BJP, Sports

    पुढील बातम्या