सायना-पारुपल्लीचा लग्नाचा दुसरा वाढदिवस, दोघांनी इन्स्टाग्रामवर शेयर केले Romantic Photo
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी या दोघांनी त्यांचे जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.
मालदीव, 18 नोव्हेंबर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी या दोघांनी त्यांचे जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. 14 डिसेंबर 2018 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. या दोन वर्षातल्या आनंदाच्या क्षणाचे फोटो पारुपल्ली कश्यपने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
पारुपल्ली कश्यप आणि सायना नेहवाल काही दिवसांपूर्वी मालदीवला गेले होते. लग्नाच्या वाढदिवसाला पारुपल्लीने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पुन्हा पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने 'आपल्या आयुष्यात काहीही झालं तरीही आपण दोघं मिळून त्याचा सामना करू शकतो' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत समुद्रकिनारी दोघंही दिसत असून सूर्यास्तापूर्वीचा हा फोटो आहे. त्याचबरोबर सायना नेहवाल हिनेदेखील दोघांचा एक शानदार फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
सायना नेहवाल हिनदेखील दोघांचा लग्नाच्या पार्टीतला फोटो अपलोड केला आहे. सायनाने यामध्ये ऑरेंज रंगाचा लेहंगा घातला असून कश्यपने पिवळा कुर्ता घातला आहे. या फोटोला तिनं 'मी जशी आहे तशी स्वीकारल्याबद्दल धन्यवाद' असं कॅप्शन दिलं आहे.
सायना नेहवाल ही ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिनं 2012 मधल्या ऑलिम्पिक (2012 Olympic) स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे.
लग्नाच्या पार्टीमधला फोटो शेअर करण्याबरोबरच तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हॉटेलच्या रूममधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत लाल फुग्यांची सजावट, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, केक आणि रिंग दिसून येत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला पारुपल्ली कश्यप कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) आढळून आला होता. त्यामुळे काहीकाळ त्याला वेगळं देखील राहावं लागलं होतं. त्याच्याबरोबर एच. एस. प्रणॉय, आरएमव्ही गुरु साई दत्त आणि प्रणव जेरी चोप्रा हे तिघंही पॉझिटिव्ह आढळले होते. पण सायना नेहवाल कोरोना निगेटिव्ह आढळून आली होती. सध्या दोघही मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत असून लवकरच नवीन स्पर्धेची तयारी सुरु करणार आहेत.