सायनाचेही जपान ओपनमधील आव्हान संपुष्टात

सायनाचेही जपान ओपनमधील आव्हान संपुष्टात

स्पेनच्या कॅरोलिना मरिननी सायनाचा २१-१६,२१-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

  • Share this:

22सप्टेंबर: सिंधू पाठोपाठ जपान ओपनमधील सायना नेहवालचं आव्हानही संपुष्टात आलंय. स्पेनच्या कॅरोलिना मरिननी सायनाचा २१-१६, २१-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये सायनानं चांगली लढत दिली. पण दुसऱ्या सेटमध्ये मात्र मरिननी आक्रमक खेळ करत अगदी सहज विजय मिळवला. दुसऱ्या फेरीतच सायना आणि सिंधू बाहेर पडल्या आहेत. के.श्रीकांतचं आव्हान अजून कायम आहे. श्रीकांतनी हाँगकाँगच्या हू यूनचा २१-१२,२१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसनशी होणार आहे.

First published: September 22, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading