सायनाची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये धडक

सायनाची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये धडक

पहिल्या सामन्यात स्विझर्लंडच्या सब्रिना जॅक्वेटचा सायनाने सहज पराभव केला आहे.

  • Share this:

ग्लासगो,24 ऑगस्ट: सायना नेहवालने बॅडमिंटन  वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रीक्वार्टर  फायनलमध्ये धडक मारली आहे. पहिल्या सामन्यात स्विझर्लंडच्या सब्रिना जॅक्वेटचा सायनाने सहज पराभव केला आहे.

या सामन्यावर पूर्णपणे सायनाच वर्चस्व होतं. सामन्यादरम्यान सब्रिना कधीही सायनापुढे आव्हान उभं करु शकली नाही.सायनानं तिचा ,21-11,21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये सब्रिनानं धडपड केली. पण 21-12 असा दुसरा सेट जिंकत सायनानं सामनाही आपल्या नावावर केला. अवघ्या 33 मिनीटात सायनानं हा सामना गुंडाळला. एकंदर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त सुरुवात केली आहे.बी साई प्रणीथ आणि सायना दोघंही प्रीक्वार्टर फायनलमध्ये पोचले आहेत.

 

First published: August 24, 2017, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading