आठ वर्षांनंतर 'या' दिवशी...सचिन, युवी, झॅकचं रियुनियन

आठ वर्षांनंतर 'या' दिवशी...सचिन, युवी, झॅकचं रियुनियन

भारतीय संघाने 2011 मध्ये आजच्याच दिवशी वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : भारतीय संघानं आजच्यादिवशी 2011 साली 28 वर्षांचा दुष्काळ संपवत विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या चेंडूवर माही स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट मारत भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

विश्वचषकाच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि युवराज सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण झाले होते. यावेळी सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर, विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणारा युवराज सिंग आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झहीर खान यांनी रियुनियन केलं.

वानखेडे स्टेडियम, 2 एप्रिल 2011 आणि यावेळी महेला जयवर्धनेच्या 103 धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने 6 बाद 274 धावा उभ्या केल्या. यावेळी कर्णधार कुमार संगकारानेही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या लक्ष्याचा पाठला करताना विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दिग्गज स्वस्तात माघारी परतले आणि स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. पण, गौतम गंभीर एका बाजूने खिंड लढवली, आणि विराटसह 83 आणि महेंद्रसिंग धोनीसह चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. त्यानंतर धोनी आणि युवराज सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने 6 विकेटने हा सामना जिंकला.

या सामन्यानंतर युवराज सिंगसह सगळेच खेळाडू मैदानावर ढसा ढसा रडताना दिसले. यावेळी अनेक वेळा भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतलेल्या सचिनला खेळाडूंनी खांद्याव घेतले. या आठवणींना उजाळा देण्यासाठी सचिन, युवी आणि झॅकनं आपला फोटो शेअर केला. सध्या वर्ल्ड कप संघातील हे तीन भिडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य आहेत.

VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

First published: April 2, 2019, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading