मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर बनला कॅप्टन, पाहा कुठे करणार फोर आणि सिक्सची बरसात?

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर बनला कॅप्टन, पाहा कुठे करणार फोर आणि सिक्सची बरसात?

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar: आशिया चषकानंतर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज सुरू होणार आहे. त्यात मास्टप ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे इंडिया लिजंड्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 1 सप्टेंबर: भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या दुसऱ्या मोसमात सचिन इंडिया लीजंड्स संघाचं नेतृत्व करेल. स्पर्धेच्या पहिल्या मोसमातही सचिननंच इंडिया लीजंड्सचं नेतृत्व केलं होतं. सचिनसोबतच युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा हे इतर खेळाडूही लीगमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत.

स्पर्धा आयोजकांनी आज या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. ही स्पर्धा 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 22 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाईल. स्पर्धेतील पहिला सामना कानपूरमध्ये होईल तर उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामने रायपूरमध्ये खेळवले जातील. यासह इंदूर आणि डेहराडून या दोन ठिकाणीही सामने खेळवले जातील. यावेळी इंडिया लीजंड्स, श्रीलंका लीजंड्स, ऑस्ट्रेलिया लीजंड्स, बांगलादेश लीजंड्स, वेस्ट इंडिज लीजंड्स, साउथ आफ्रिका लीजंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - Irfan Pathan: इरफान पठाणची नवी इनिंग, तामिळ चित्रपटात झळकला स्विंगचा बादशाह

रोड सेफ्टी लीगचा उद्देश

या लीगचा मुख्य उद्देश देशात आणि जगभरातील रस्ते सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. या मालिकेला भारत सरकारच्या परिवहन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसच युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचा देखिल पाठिंबा आहे. या स्पर्धेबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय, "मला विश्वास आहे की रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज सामाजिक बदलामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि लोकांचा रस्ता आणि रस्ता सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ म्हणून काम करेल." रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Sachin tendulkar, Sports, T20 cricket