मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

नागपूर विमानतळावर लॅन्ड होताच स्वत: ड्राइव्ह करत सचिन तेंडूलकर वाघोबाच्या दर्शनाला; पाहा VIDEO

नागपूर विमानतळावर लॅन्ड होताच स्वत: ड्राइव्ह करत सचिन तेंडूलकर वाघोबाच्या दर्शनाला; पाहा VIDEO

सचिन तेंडूलकरचं नुकतंच नागूपर विमानतळावर आगमन झालं आहे. विमानतळावर लॅन्ड होताच तो स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे.

सचिन तेंडूलकरचं नुकतंच नागूपर विमानतळावर आगमन झालं आहे. विमानतळावर लॅन्ड होताच तो स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे.

Sachin tendulkar at Nagpur Airport: सचिन तेंडूलकरचं नुकतंच नागपूर विमानतळावर आगमान झालं आहे. तो स्वत: कार ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनाला रवाना झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 04 सप्टेंबर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं क्रिकेटवर किती प्रेम आहे, ते आपल्या सर्वांना माहीत आहेच. 100 शतकं ठोकून दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेट प्रेमींच्या हृदयात आदराचं स्थान मिळवणाऱ्या सचिन तेंडूलकरला वाघांबाबतही खूपच आकर्षण आहे. सचिन यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हाड आणि ताडोबा याठिकाणी आपल्या कुटुंबीयांसोबत अनेकदा वाघोबाच्या दर्शनाला आला आहे. यानंतर तो पुन्हा जंगलसफारीसाठी ताडोबाला रवाना झाला आहे.

नुकतंच त्याचं नागूपर विमानतळावर त्याचं आगमन झालं आहे. विमानतळावर लॅन्ड होताच तो स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचं कुटुंबही होतं. गेली अनेक दिवस लॉकडाऊनमुळे घरातच राहिल्यानंतर सचिन तेंडूलकर आपल्या कुटुंबासोबत ताडोबाच्या जंगलसफारीसाठी रवाना झाला आहे. यावेळी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तो स्वत: ड्राइव्ह करत ताडोबाला गेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा-गांगुली-सेहवाग KBC मध्ये जिंकले एवढे रुपये, 'धोनी'चं उत्तर देण्यात दोघं अपयशी

विशेष म्हणजे, यापूर्वीही अनेकदा सचिन तेंडूलकर आपल्या कुटुंबीयांसोबत जंगलसफारीसाठी याठिकाणी आला आहे. यातून त्याचं वाघांप्रती असलेलं प्रेम दिसून येतं. यापूर्वी तो उमरेड कऱ्हाड आणि ताडोबा याठिकाणी वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी मुक्कामी थांबला होता. यावेळीही तो ताडोबाच्या चिमूर भागातील एका खाजगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी राहणार आहे. नागपूर विमानतळावरून स्वत: ड्राइव्ह करत तो ताडोबाला जातानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

First published:

Tags: Nagpur, Sachin tendulakar