IPL 2019 : मुंबईनं सामना जिंकला तरी, सचिन झाला नाराज

IPL 2019 : मुंबईनं सामना जिंकला तरी, सचिन झाला नाराज

१३६ धावांचा बचाव करताना मुंबईचा हैदराबादवर ४० धावांनी विजय.

  • Share this:

हैदराबाद, 07 एप्रिल : सनरायझर्स हैदराबादला 96 धावांत गुंडाळूव मुंबईने 40 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा त्यांच्याच घरच्या मैदानावर रोहितच्या पलटननं नमवलं. या सामन्यात अल्झारी जोसेफ यानं आपली कमाल दाखवत पर्दापणातच हैदराबादच्या सहा फलंदाजानं तंबूत पाठवले. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ यानं १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.मुंबईच्या संघानं उत्तम गोलंदाजी करत विजय मिळवला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर मात्र नाराज आहे. त्याच्या नाराजीचं कारण मात्र काही तरी वेगळेच आहे. सचिननं ट्विट करत मुंबईला विजयाच्या शुभेच्छा दिल्या पण एक खंतही बोलून दाखवली. सचिननं आपल्या ट्विट करत, मुंबईनं हैदराबादवर मिळवलेला विजय हा खरंच उत्तम होता. पण हा विजय पाहण्यासाठी मी हैदराबादच्या ‘त्या’ स्टेडियमध्ये उपस्थित नव्हतो, याचं मला वाईट वाटतयं. याशिवाय, त्याने अल्झारी जोसेफचेही कौतुक केले.जोसेफनं 11 वर्षे अबाधित असलेला आयपीएलचा रेकॉर्डही मोडला. आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या पर्दापणातच जोसेफनं 12 धावा देत 6 विकेट घेतल्या. आणि त्यानं 11 वर्षांचा सोहेल तनवीरचा रेकॉर्ड मोडला.


VIDEO: चड्डी-बनियान गँगचा पेट्रोल पंपावर दरोडा; दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 10:07 AM IST

ताज्या बातम्या