IPL 2019 : ...या कारणामुळं कोटलाच्या मैदानावर उतरला सचिन, पाहा व्हिडिओ

IPL 2019 : ...या कारणामुळं कोटलाच्या मैदानावर उतरला सचिन, पाहा व्हिडिओ

दिल्लीच्या पीचमध्ये नेमकं दडलंय तरी काय, हे उलघडण्यासाठी अखेर क्रिकेटच्या देवालाच मैदानावर उतरावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी सर्व संघांमध्ये लढत सुरू असताना, मुंबई आणि दिल्ली यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. हा सामना फिरकी गोलंदाजांनी गाजवला असं म्हणायला हरकत नाही.

दिल्लीच्या वादग्रस्त कोटला मैदानावर सामना सुरु असताना, मुंबईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवात चांगली मिळाली असली तरी, मधल्या फळीतले फलंदाज विशेष चांगली कामगिरी करु शकले नाही. अखेर पांड्या बंधूंच्या मदतीनं मुंबईनं दिल्लीसमोर 169 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान आजचा दिवस खास ठरला तो, महान गोलंदाज सचिन तेंडुलकरमुळं. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा सल्लागार आहे. पण आतापर्यंत सचिन कधीही खेळपट्टी पाहण्यासाठी आला नव्हता. पण फिरोझशाह कोटला मैदानातील खेळपट्टी पाहण्यासाठी सचिन आवर्जुन आला.त्यामुळं या दिल्लीच्या पीचमध्ये नेमकं दडलंय तरी काय, हे उलघडण्यासाठी अखेर क्रिकेटच्या देवालाच मैदानावर उतरावं लागलं. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना सुरु होण्याआधी सचिन मैदानावर उतरला.

त्यानंतर रोहितनं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईला सुरुवात चांगली मिळाली असली तर, दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र पांड्या बंधूंनी उत्तम फलंदाजी करत मुंबई संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले.

तर, 169 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची मात्र दमछाक झाली. राहुल चहरच्या फिरकीपुढं दिल्लीच्या गोलंदाजांनी नांगी टाकली.राहुल चहरनं आपल्या 4 ओव्हरमध्ये 4.75च्या सरासरीनं केवळ 19 धावा दिल्या. दीपकनं महत्त्वाचे फलंदाज पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर यांना स्वस्तात बाद केलं.

त्यानंतर अक्सर पटेलनं काहीसा प्रयत्न केला, पण त्याच्या एकाकी झुंजी पुढं दिल्लीचा संघ तारू शकला नाही. अक्सर 26 धावा करत बाद झाला.

मुंबईकडून राहुल चहरनं 3, बुमराहनं 2 तर, मलिंगा आणि कृणाल पांड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतल्या. पण आजचा दिवस गाजवला तो, फिरकी गोलंदाजांनी. दिल्लीकडूनही अमित मिश्रानं उत्तम गोलंदाजी केली.

फिरोजशहा कोटला मैदानावर मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यात रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला. यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आलं. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत मुंबईला धावांचं आव्हान गाठून दिलं. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावांचं आव्हान आहे. दिल्लीकडून कगिसो रबाडाने २ तर अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी १-१ बळी घेतला.VIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 11:05 PM IST

ताज्या बातम्या