आता दिसणार सचिन VS युवराज! असा आहे Bushfire League मध्ये दिग्गजांचा संघ

आता दिसणार सचिन VS युवराज! असा आहे Bushfire League मध्ये दिग्गजांचा संघ

ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये लागलेल्या आगीत होरपळलेल्या लोकांच्या मदतीसाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानात बुश फायर क्रिकेट बॅश सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये लागलेल्या आगीत होरपळलेल्या लोकांच्या मदतीसाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

बुश फायर क्रिकेट बॅश सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीमचा माजी खेळाडू सिस्कर किंग युवराज सिंह हा गिलख्रिस्ट इलेव्हन संघाकडून खेळणार आहे. तर दुसरीकडे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाँटिंगच्या नेतृत्वातील संघाचं कोचिंग करणार आहे.

दरम्यान, बुश फायर क्रिकेट बॅशचा हा सामना पाँटिंग इलेव्हन विरुद्ध वॉर्न इलेव्हन असा होणार होता. मात्र आधी हा सामना शनिवारी खेळवण्यात येणार होता. मात्र नंतर तो रविवारवर ढकलण्यात आला. त्यातच रविवारी शेन वॉर्नला एका तातडीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेला जायचं असल्याने तो या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.

वॉर्न या सामन्यात सहभागी होणार नसल्याने आता गिलख्रिस्टच्या संघ पाँटिंगला आव्हान देणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन संघ जाहीर करण्यात आला. दिग्गज क्रिकेटपटूंचा भरणा असलेला हा सामना 10-10 षटकांचा असणार आहे.

कशी असेल प्लेईंग इलेव्हन?

Ponting XI (कोच : सचिन तेंडुलकर): मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, रिकी पाँटिंग(कर्णधार), एलिसी विलानी, ब्रायन लारा, फोइबे लिचफील्ड, ब्रॅड हॅडिन(विकेटकीपर), ब्रेट ली, वसीम अकरम, डॅन क्रिस्चियन आणि ल्यूक होग

Gilchrist XI (कोच: टिम पेन): अ‍ॅडम गिलख्रिस्ट(कर्णधार आणि विकेटकीपर), शेन वॉटसन, ब्रॅड होग, युवराज सिंह, एलेक्स ब्लॅकवेल, अँड्रयू सायमंड्स, कर्टनी वॉल्श, निक रिवोल्ड, पीटर सिडल, फावद अहमद आणि एका खेळाडूच्या नावाची घोषणा अद्याप बाकी आहे.

First published: February 6, 2020, 9:56 PM IST

ताज्या बातम्या