मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday कांबळ्या, पाहा सचिनने व्हिडिओतून मित्राला दिलेल्या शुभेच्छा

Happy Birthday कांबळ्या, पाहा सचिनने व्हिडिओतून मित्राला दिलेल्या शुभेच्छा

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत विनोद कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत विनोद कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत विनोद कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई,18 जानेवारी: विनोद कांबळी (Vinod Kambli) हे भारतीय क्रिकेट विश्वातलं गाजलेलं नाव. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीविषयी खूप बोललं जातं. दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आज विनोद कांबळीचा 48 वा वाढदिवस आहे.आपल्या या मित्राला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही बर्थडेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.  'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कांबळ्या..!' वाढदिवसाचं सरप्राइज गिफ्ट तुझी वाट बघत आहे. अशा शब्दांमध्ये सचिननं  मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील क्रिकेट प्रेमींकडूनही शुभेच्छा दिल्या जातायत.  कांबळीने 1994 मध्ये 14 मॅचेसमध्ये 1 हजार रन करून इतिहास रचला होता. आजही त्याचा तो रेकॉर्ड कायम आहे.  18 जानेवारी 1972 ला मुंबईमध्ये जन्म झालेल्या विनोद कांबळीने भारताकडून 17 टेस्ट आणि 104 वनडे मॅचेस खेळल्या. सचिन तेंडूलकरही नाही तोडू शकला विनोद कांबळीचं रेकॉर्ड विनोद कांबळीने आतंरराष्ट्रीय मॅचेस खेळतानाही प्रभावी खेळ करत क्रीडाप्रेमींच्या मनात घर केलं. सुरूवातीच्या चार मॅचेसपैकी दोन मॅचेस मध्ये शतक करून भारतीय संघात आपलं प्रभावी स्थान निर्माण केलं होतं. विनोद कांबळी जरी भारताकडून अधिक मॅचेस खेळू शकला नाही तरी देखील त्याच्या नावे आजही अशी रेकॉर्ड आहेत जी रेकॉर्ड त्याचा मित्र आणि क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सचिन तेंडूलकरही तोडू शकलेला नाही. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्य़ा जोडीने शारदाश्रम शाळेकडून खेळताना 664 धावांची पार्टनरशिप केली होती. त्यांच्या या खेळीने त्यावेळी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती. विनोद कांबळीला सचिन सारखं यश मिळालं नाही विनोद कांबळीला सिनिअर टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आणि जेव्हा त्याला सीनिअर टीममध्ये स्थान मिळालं तेव्हा त्याने संधींचं सोनं करत 80 रनचा पल्ला गाठत चांगला खेळ केला. रणजी संघात स्थान मिळाल्यानंतर 3 वर्षानंतर त्याला भारतीय संघात खेळ्याची संधी मिळाली. भारतीय संघासाठी खेळताना सुरूवातीच्या 7 मॅचेसमध्ये 4 शतकांची खेळी त्याने केली होती. असं असताना वयाच्या 23 व्या वर्षीच विनोद कांबळीचं करिअर संपण्याच्या वाटेवर आलं. 17 टेस्ट मॅचेस खेळल्यानंतरही त्याला टीम मधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तो पुन्हा कधीच टेस्ट मॅच खेळला नाही. 1995 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्याने शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. त्याचं वनडे करिअर देखील 2000 मध्येच संपुष्टात आलं. केएल राहुलच्या कामगिरीमुळे दोघांचे संघातील स्थान अडचणीत?
First published:

Tags: Sachin tendulkar

पुढील बातम्या