Home /News /sport /

टीमला चॅम्पियन केलं, पण मिळाले नाहीत पूर्ण पैसे, सचिनचा आता स्पर्धा खेळायला नकार!

टीमला चॅम्पियन केलं, पण मिळाले नाहीत पूर्ण पैसे, सचिनचा आता स्पर्धा खेळायला नकार!

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) दुसऱ्या मोसमात खेळणार नाही. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचं मानधन खेळाडूंना दिलं गेलेलं नाही. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू सहभागी होतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जानेवारी : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) दुसऱ्या मोसमात खेळणार नाही. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचं मानधन खेळाडूंना दिलं गेलेलं नाही. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू सहभागी होतात. पहिल्या मोसमात सचिनची टीम इंडिया लिजेंड्सने (India Legends) ट्रॉफी जिंकली होती. आयोजकांनी पूर्ण पैसे न दिल्यामुळे सचिनने आता स्पर्धेतून स्वत:ला पूर्णपणे बाजूला केलं आहे. बांगलादेशमधल्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या देशाच्या खेळाडूंनाही पहिल्या मोसमाचं मानधन मिळालं नाही. बांगलादेशचे खालिद महमूद, खालिद मसूद, मेहराब हुसैन, राजेन सालेह, हन्नान सरकार आणि नफीस इकबाल या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. सचिन तेंडुलकर पहिल्या मोसमाचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होता, तसंच सुनिल गावसकर स्पर्धेचे कमिश्नर होते. पीटीआयला याबाबत माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितलं की, 'सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या नव्या मोसमाचा भाग असणार नाही. स्पर्धा युएईमध्ये 1 ते 19 मार्चदरम्यान होणार आहे, पण सचिन या स्पर्धेत दिसणार नाही. सचिनही पैसे न मिळालेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याबाबत माहिती घ्यायची असेल, तर रवी गायकवाड यांच्याकडे संपर्क केला पाहिजे, कारण ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते.' रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजसाठी करार झाल्यानंतर खेळाडूंना 10 टक्के रक्कम देण्यात आली होती, यानंतर 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत 40 टक्के आणि उरलेली 50 टक्के रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत द्यावी लागणार होती. स्पर्धेची फायनल रायपूरमध्ये झाली होती. याच स्पर्धेनंतर सचिनसह बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागणही झाली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Sachin tendulkar

    पुढील बातम्या