मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार आजच्या मॅचची कॉमेन्ट्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2017 02:40 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार आजच्या मॅचची कॉमेन्ट्री

04 जून : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असणारेत. क्रिकेट चाहतांसाठी ही मॅच नेहमीच महत्वाची असते. मात्र आता या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर कॉमेंट्री करणार असल्याने या मॅचचं महत्व आणखीनच वाढलंय.

स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन कॉमेंट्री करताना पहायला मिळेल. सचिनसोबत या कॉमेंट्री टीममध्ये आकाश चोप्रा, सुनिल गावस्कर, साबा करीम आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही समावेश आहे. एखाद्या क्रिकेट सामन्यात कॉमेंट्री करण्याची ही सचिनची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्येही सचिन आणि सेहवागची जोडी जमणार, म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी हा डबल धामाका असणारे, यात काही शंकाच नाही.

आता सचिन तेंडुलकर फक्त आजच्या मॅचमध्ये काॅमेंट्री करणार आहे, की चँपियन ट्रॉफीतील अन्य मॅचेसमध्येही तो चाहात्यांचं मनोरंजन करणारे याबाबात अजुन कोणतीही निश्चित माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...