क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुंबईमधील क्रिकेट वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

  • Share this:

मुंबई 11 ऑक्टोबर : मुंबईला क्रिकेटची पंढरी मानली जाते. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईला महत्त्वाचे स्थान आहे. सुरुवातीच्या काळात मुंबई भारतीय क्रिकेटसाठी पॉवरहाऊस राहिला आहे. मात्र काही वर्षांपासून भारतीय संघाला पाहावे तसे चांगले खेळाडू मिळाले नाही आहेत. त्यामुळं मुंबईतील क्रिकेट प्रेम जिवंत राहावे यासाठी सचिन मैदानात उतरला आहे.

महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुंबईमधील क्रिकेट वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. यात सचिननं युवा खेळाडू आणि स्थानिक स्पर्धा वाढवण्यासाठी मैदानांची संख्या वाढवणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही तर सचिननं संघांनी बसने प्रवास करू नये, असा सल्लाही दिला आहे.

मुंबई संघानं रणजी क्रिकेटमध्ये 41वेळा चषक जिंकण्याचा विक्रम केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबईला चषकही मिळवता आले नाही आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेतही मुंबईचा संघ विशेष चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. एमसीएची नवी मॅनेजमेंट कमिटी तयार करण्यात आली आहे. यावेळी सचिननं क्रिकेट सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले. या बैठकिला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अमोल काळे, सचिन संजय नाईक आणि अपेक्स काउंसिलचे सदस्यही उपस्थित होते.

वाचा-आफ्रिकेच्या खेळाडूंचा मैदानावरचं राडा! एकमेकांना शिव्या घातल्याचा VIDEO VIRAL

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या बैठकीत 15 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. तसेच, या मुद्द्यांचा विचार करता क्रिकेटची प्रगती नक्कची होईल अशी शक्यताही एमसीएनं वर्तवली आहे. सचिननं दिलेल्या माहितीत, मैदानांची संख्या वाढवा, शालेय ठिकाणी 14 सदस्यांच्या संघाची स्थापणा, तसेच शालेय काळापासून महिलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन देणे असे सल्ले देण्यात आले.

वाचा-टीम इंडियाच्या ‘पोस्टर बॉय’चे कधीही न पाहिलेले फोटो पाहा एका क्लिकवर

याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, सचिननं दिलेल्या सल्ल्यांचा नक्कीच विचार केला जाईल, त्यासाठी प्रक्रियाही सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या आगामी निवडणुकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व संजय नाईक करतील.

वाचा-कसोटी क्रिकेटचा नवा 'डॉन', दिग्गजांचे रेकॉर्ड तोडत विराटची दादागिरी

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 07:43 AM IST

ताज्या बातम्या