नवी दिल्ली, 18 जून : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच (Sachin Tendulkar) त्याचा मुलगा अर्जुनही (Arjun Tendulkar) कायम चर्चेत असतो. अर्जुन एक चांगला अष्टपैलू खेळाडू असून, भारताच्या अंडर-19 संघाचा हिस्साही होता. मात्र सध्या अर्जुन त्याच्या खेळामुळे नाही तर एक वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅट (Danielle Wyatt) अर्जुननं आपल्याला धमकी दिल्याचं सांगितलं आहे. डॅनिएलनं एका वृत्तसंस्थेची बोलताना हा खुलासा केला.
डॅनिएलनं सांगितले की, अनेकदा इंग्लंडमध्ये अर्जुननं तिला गोलंदाजी केली आहे. तेव्हा अर्जुननं तिला बाऊन्सर आणि डोक्यावर चेंडू मारण्याचा इशारा दिला होता. मुख्य म्हणजे डॅनिएल आणि सचिनचा मुलगा अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. मात्र डॅनिएल कायम अर्जुनच्या गोलंदाजीवर फलंदाजी करण्यास घाबरते.
वाचा-CSK संघातील 'या' व्यक्तीनं शहीद जवानांचा केला अपमान
...म्हणून अर्जुननं दिली होती धमकी
डॅनिएल वॅटनं क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या माहितीत, "मी अर्जुन आणि सचिनला पहिल्यांदा लॉर्ड्सवर भेटले. 2009ची ही गोष्ट आहे. 2010मध्ये मी एमसीसी यंग क्रिकेटर्ससोबत लॉर्ड्सवर ट्रेनिंग घेत होती. त्यावेळी अर्जुन फक्त 10 वर्षांचा होता. त्यावेळी मी त्याला गोलंदाजी केली, आणि तो आत्मविश्वासानं फलंदाजी करत होता", असे सांगितले. तसेच, डॅनिएल म्हणाली की, "वयानुसार अर्जुनची गोलंदाजी आणि त्याची फलंदाजी चांगली झाली आहे. गोलंदाजीला गती आली आहे".
वाचा-क्रिकेट क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी, भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द
डॅनिएल आणि तेंडुलकर यांचे संबंध
मुख्य म्हणजे डॅनिएल आणि अर्जुनसोबतच नाही तर तेंडुलकर कुटुंबासोबतच चांगले संबंध आहेत. डॅनिएल सचिन आणि अंजली तेंडुलकरलाही चांगली ओळखते. डॅनिएल ही इंग्लंडची सलामीची फलंदाज असून नुकत्याच झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिनं भाग घेतला होता. मात्र डॅनिएलला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. डॅनिएल वॅटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनवेळा शतकी खेळी केली आहेत. यातील एक भारताविरुद्ध केले आहे.
वाचा-कोरोनाच्या संकटातही याच वर्षी होणार IPL, गांगुलीनं सांगितला प्लॅन
संपादन-प्रियांका गावडे.