मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO: मास्टर ब्लास्टरच्या अर्जुननं खातं उघडलं; फक्त 4 रन्सवर आघाडीच्या फलंदाजाला तंबूत पाठवलं

VIDEO: मास्टर ब्लास्टरच्या अर्जुननं खातं उघडलं; फक्त 4 रन्सवर आघाडीच्या फलंदाजाला तंबूत पाठवलं

सचिन तेंडुलकरचा मुलाने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात भन्नाट विकेट घेतली. त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलाने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात भन्नाट विकेट घेतली. त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलाने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात भन्नाट विकेट घेतली. त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  मुंबई, 15 जानेवारी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने सीनियर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत हरियाणाच्या ओपनिंग बॅट्समनला चौथ्या रनवर तंबूत पाठवलं. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबईसाठी पदार्पण केलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) च्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. ऑलराऊंडर असलेला अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आणि बॅट्समन आहे.

  याआधी अर्जुन मुंबई अंडर-19, इंडिया अंडर-19 कडून श्रीलंकेविरुद्ध चार दिवसांची मॅच खेळला. आता पहिल्यांदाच तो फर्स्ट क्लास सीनिअर क्रिकेटमध्ये खेळत आहे. मध्यंतरी त्याने टीम इंडियाला त्याने नेटमध्ये बॉलिंग करून सरावही दिला होता. 2017 साली इंग्लंड दौऱ्यात अर्जुनच्या यॉर्करमुळे जॉनी बेयरस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे काही काळ त्याला विश्रांती घ्यावी लागली.

  मुंबईच्या सिनियर टीममध्ये पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकरची निवड झाली आहे. अर्जुनचे वडिल सचिन तेंडुलकरने वयाच्या 15 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. अर्जुनच्या पहिल्या सामन्यातली पहिली विकेट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. त्याचा एक्स्लुझिव्ह VIDEO एका ट्विटर यूजरने शेअर केला आणि आाता अर्जुनची हवा निर्माण झाली आहे.

  1988 साली रणजी ट्रॉफी मॅचमध्ये गुजरातविरुद्ध सचिन पहिल्यांदा मैदानात उतरला.कर्णधार असताना 1994-95 साली सचिनने पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. याचसोबत 1999-2000, 2008-09 आणि 2012-13 साली मुंबईचा रणजी ट्रॉफीमध्ये विजय झाला तेव्हा सचिन मुंबईच्या टीममध्ये होता.

  आता मुलगा अर्जुनसाठी त्याची पहिली वहिली मॅच महत्त्वाची आहे. त्यात ठसा उमटवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे या मॅचमध्ये विजय मिळवणं मुंबईसाठी गरजेचं आहे.

  First published:

  Tags: Cricket, Sachin tendulkar