सचिनचा मास्टरस्ट्रोक! चॅलेंज पूर्ण करत दिलं असं उत्तर की युवराज म्हणाला, 'मर गए'

सचिनचा मास्टरस्ट्रोक! चॅलेंज पूर्ण करत दिलं असं उत्तर की युवराज म्हणाला, 'मर गए'

युवराज सिंगने दिलेलं आव्हान पूर्ण केल्यानंतर सचिन तेंडुलकरने व्हिडिओ शेअर करून त्याला नवं चॅलेंज दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : सध्या सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यात चॅलेंज देण्याची स्पर्धा रंगली आहे. युवराजनं दिलेलं आव्हान पूर्ण केल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याला नवं चॅलेंज दिलं आहे. सचिनने ट्विट करत म्हटलं की, युवराज तु मला सोपा पर्याय दिला होतास. म्हणून मी तुला कठीण पर्याय देत आहे. तुला नॉमिनेट करतोय. ये आणि आता हे पूर्ण कर.

शनिवारी सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सचिनने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. सचिने बॅट हातात घेतली असून चेंडू बॅटवर उडवत असल्याचं दिसतं. सचिनने 32 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात चेंडू सतत बॅटच्या एजवर उडवल्यानंतर सचिन म्हणतो की, युवी तुझं चॅलेंज स्वीकारलं होतं. आता तुला पुन्हा चॅलेंज हे पट्टी बांधून कर.

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन असून लोक घरात अडकले आहे. युवराज सिंगने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात चेंडू बॅटने हवेत उडवताना दिसतो. त्यानं सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना हे आव्हान दिलं होतं.

हे वाचा : डेव्हिड वॉर्नरचा 'बाहुबली' अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी

युवराजनं दिलेल्या चॅलेंजनंतर सचिनने ते पूर्ण करत व्हिडिओ शेअर केला. पण त्यासोबत युवराजला पुन्हा चॅलेंज केलं आहे. सचिनचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सचिनच्या या चॅलेंजवर युवराजनं मात्र चक्क मर गए असं उत्तर दिलं आहे.

हे वाचा : अनुष्काने विराटला टाकला बाऊन्सर, लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना VIDEO व्हायरल

First published: May 16, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या