प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

सलामीला फलंदाजी करण्यासाठी सचिनला दिग्गज खेळाडूंकडे करावी लागली होती विनंती.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं 16 नोव्हेंबर 2013मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र, सचिनच्या जीवनाविषयी अजूनही काही गोष्टी या चाहत्यांना माहित नाही आहेत. तशीच एक गोष्ट सचिननं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितली. ही गोष्ट सचिनच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरली.

हा किस्सा असा होता की, 1994मध्ये न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीला उतरण्यासाठी सचिनला विनंती करावी लागली होती. सचिनला सलामीला संधी देण्यासाठी संघातील तेव्हाचे खेळाडू तयार नव्हते, मात्र सचिनचा हट्ट अखेर खरा ठरला. सचिन सलामीला उतरला हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. सचिननं सलामीला फलंदाजी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतक केले.

लिंकडीनवर एक व्हिडिओ शेअर करत सचिननं ऑकलॅंडमध्ये न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यांतील आठवणींना उजाळा दिला. सचिननं यावेळी, “1994मध्ये जेव्हा भारतासाठी सलामी करायची होती. तेव्हा सर्व संघांची रणनीती विकेट वाचवणे होती. मात्र त्यावेळी मी थोडा हटके विचार केला”, असे सांगितले. यावेळी तेंडुलकरनं, “मी त्यावेळी विचार केला की प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा मी सामना करू शकतो. मात्र त्यासाठी मला विनंती करावी लागली की, मला संधी द्या. जर मी अपयशी ठरलो तर मी परत कधीच तुमच्याकडे येणार नाही”, असेही सांगितले. सचिननं युवकांना, “आयुष्यात नवीन काही करण्यासाठी कधीच विचार करू नका, आयुष्यात मोठं व्हायचे असेल तर असा धोका पत्करावा लागतोच”, असा संदेश दिला.

वाचा-आफ्रिदी की विराट? डेटवर जाण्यासाठी पाकिस्तानी तरूणींनी सांगितली पहिली पसंती

सचिननं एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 340 सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. मात्र त्यासाठी सचिननं असे पाऊल उचलावे लागले होते, अशी अपेक्षा कोणीच केली नसेल. 1994मध्ये ऑकलॅंडमध्ये न्यूझीलंडविरोधात झालेल्या सामन्यात नवज्योतसिंग सिध्दूच्या जागी सलामीला फलंदाजी केली. याबाबत सांगताना सचिननं, “न्यूझीलंड विरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात सचिननं 49 चेंडूत आक्रमक फलंदाजी करत 82 धावा केल्या होत्या. त्यामुळं दुसऱ्या सामन्यात सचिनला सलामीला फलंदाजी करण्यासाठी परत कोणालाही विचारावे लागले नाही. त्यानंतर सचिननं 340 सामन्यांत सलामीला फलंदाजी केली”, असा किस्सा सांगितला.

वाचा-लिलावाची तारीख ठरली, मात्र टी-20 वर्ल्ड कपमुळं वेळापत्रकात होणार बदल

करिअरच्या सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या सचिननं सप्टेंबर 1994मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कोलंबोमध्ये पहिले शतक केले. त्यानंतर सचिननं मागे वळून पाहिले नाही. सचिननं 200 कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा केल्या आहेत. तर, 463 एकदिवसीय सामन्यात 18 हजार धावा केल्या आहेत. अजूनही सचिनचा हा विक्रम कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही.

वाचा-भारताचा जेंटलमन आरोपीच्या पिंजऱ्यात! गंभीर आरोपांवर आज होणार फैसला

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading