Home /News /sport /

चाहत्याचं सचिनला भावनिक आवाहन, 'क्रिकेटचा देव'ही पावला!

चाहत्याचं सचिनला भावनिक आवाहन, 'क्रिकेटचा देव'ही पावला!

जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या चाहत्याच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या चाहत्याच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. सचिनचा चाहता असलेल्या नील नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर भावनिक आवाहन केलं. '2020 हे वर्ष माझ्यासाठी कधीही विसरू न शकणारं आणि क्लेषदायक राहिलं. 3 नोव्हेंबरला माझ्या वडिलांचं निधन झालं. ते तुमचे खूप मोठे चाहते होते आणि माझा आधार होते. तुम्हाला कसं सांगायचं हे मला कळत नाही, पण आज माझा वाढदिवस आहे. मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. त्यामुळे मला सामर्थ्य मिळेल,' असं ट्विट सचिनच्या चाहत्याने केलं. सचिन तेंडुलकरनेही चाहत्याच्या या ट्विटला प्रतिसाद दिला. 'स्वत:च्या जवळची व्यक्ती गमावणं हा आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ असतो. ते तुमच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच असतील. वरून ते तुम्हाला नक्कीच बघत असतील. नील तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, आम्ही सगळे तुझ्यासाठी शुभेच्छा देतो,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर याने मुंबईतल्या रस्त्यावर हरवल्याचा एक व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये एका रिक्षाचालकाने सचिनची मदत केली होती. या रिक्षाचालकाशी सचिन मराठीमध्ये बोलला होता. सचिनचा गाडी थांबवून रिक्षाचालकाशी मराठीमध्ये संवाद, पाहा VIDEO सचिन तेंडुलकर हा नेहमीच त्याच्या सामाजिक उपक्रमाबाबतही आघाडीवर असतो. सचिन तेंडुलकरने त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने 6 राज्यांमधल्या 100 गरीब विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च उचलला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या विद्यार्थ्यांची मदत सचिनने केली. त्याआधी सचिनने शान्य भारतातल्या आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात मुलांच्या उपचारासाठी लागणारी साहित्य पुरवली होती. याचा फायदा एका वर्षात दोन हजार मुलांना होणार आहे. गरजूंसाठी क्रिकेटचा देव धावला! सचिनने दिला 6 राज्यातल्या मुलांवर उपचारासाठी निधी
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या