मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटला काय सांगितलं? सचिनने जागवल्या आठवणी

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटला काय सांगितलं? सचिनने जागवल्या आठवणी

1983 नंतर क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) जिंकण्याचं भाग्य भारतीय टीमच्या नशिबी येण्यासाठी 2011 साल उजाडावं लागलं. त्या वेळच्या विजयाच्या मुख्य शिलेदारांपैकी असलेला महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)याने नुकत्याच त्या विजयाच्या आठवणी जागवल्या.

पुढे वाचा ...

    मुंबई, 18 मे : 1983 नंतर क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) जिंकण्याचं भाग्य भारतीय टीमच्या नशिबी येण्यासाठी 2011 साल उजाडावं लागलं. त्या वेळच्या विजयाच्या मुख्य शिलेदारांपैकी असलेला महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)याने नुकत्याच त्या विजयाच्या आठवणी जागवल्या. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium)रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवलं. नुवान कुलसेखराने टाकलेला बॉल कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) स्टँडमध्ये फटकावला आणि वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं. या विजयानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेऊन मैदानावर फेरफटका मारून विजयोत्सव साजरा केला.

    लीजंड्स विथ अनअॅकॅडमी (Legends with Unacademy) या यू-ट्यूब शोमध्ये सचिनने त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. 'विजयी मिरवणुकीच्या वेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि युसुफ पठाणने (Yusuf Pathan)मला खांद्यावर उचलून घेतलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, की मी खाली पडणार नाही याची काळजी घ्या. वर्ल्ड कप केवळ टीम इंडियाने जिंकलेला नाही, तर अख्ख्या देशानेच तो जिंकलेला आहे. हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. कपिल देव यांना मी 1983मध्ये वर्ल्ड कप उंचावताना पाहिलं होतं, तो अविस्मरणीय, अविश्वसनीय अनुभव होता. तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत तो विजय साजरा केला होता. त्यानंतर मीही वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी ठरवलं होतं, की काहीही झालं तरी आपल्याला त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने लक्ष केंद्रित करायला हवं,' असं सचिनने सांगितलं.

    'मुंबईत वानखेडे स्टेडियमवरचा तो दिवसही अविश्वसनीय होता. माझ्या आयुष्यातला तो बेस्ट क्रिकेटिंग डे होता. अशा फारच थोड्या गोष्टी असतात, की ज्या वेळी अख्खा देश विजयोत्सव साजरा करतो,' असंही सचिनने नमूद केलं.

    2011नंतरच्या 10वर्षांत मात्र भारताला वर्ल्ड कप पुन्हा उंचावता आलेला नाही. 2015 आणि 2019या दोन्हीही वर्षी भारताला निराश होऊन परतावं लागलं होतं. 2015 मध्ये वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर 2019 मध्ये इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला.

    आता लवकरच भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्टचॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट मालिकाही भारतीय टीम खेळणार आहे. त्याच कालावधीत आणखी एक भारतीय टीम श्रीलंकेविरुद्ध मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीचा संघ अद्याप जाहीर व्हायचा आहे.

    First published:

    Tags: Sachin tendulkar, Virat kohli, World cup india