सचिन तेंडुलकरने सारासोबत केला 'डॅड जोक'!, चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

सचिन तेंडुलकरने सारासोबत केला 'डॅड जोक'!, चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही त्याची मुलगी सारा (Sara Tendulkar) हिच्याशी बोलताना असाच जोक मारला आणि हा डॅड जोक इंटरनेट आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : आई-वडिलांशी बोलताना अनेकदा ते असं काही बोलतात की आपल्याला हसू आवरत नाही. कधीकधी त्यांचं अज्ञान पाहून आपल्याला हसू येतं तर कधीकधी नकळत ते विचित्र बोलून जातात. सगळ्यांचे वडील असा विनोद कधीतरी करतात त्यालाच ‘डॅड जोक’ म्हटलं जातं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही त्याची मुलगी सारा (Sara Tendulkar) हिच्याशी बोलताना असाच जोक मारला आणि हा डॅड जोक इंटरनेट आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याचं झालं असं, क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन सध्या बायको अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्यासोबत सुटीचा आनंद लुटतोय. सचिन कुटुंबासोबत नेमका कुठे फिरायला गेला आहे, हे कळलं नसलं, तरी त्याने इथला फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.

सचिनच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सचिन सोशल मीडियावर काही किस्से, विनोद पण टाकतो त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो.

आता त्याने सहलीतील एक सेल्फी सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात तो आणि त्याची मुलगी सारा समुद्रात एका बोटीवर आहेत असं दिसतंय. या दोघांनीही लाइफ जॅकेट घातलंय आणि स्पोर्टी गॉगलही घातला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये सचिननी टिपिकल डॅड जोक केला आहे. त्याला नेटिझन्सनी किंग ऑफ डॅड जोक असं म्हटलंय.

फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये सचिननी लिहिलंय, "Sara: Baba are we lost at sea? Me: I'm not shore!#vacation #sea”

इथं Sure (खात्री) ऐवजी सचिननी Shore (समुद्र किनारा) हा इंग्रजी शब्द वापरून कोटी केली आहे, त्यामुळे तो वाचणाऱ्यांना हा टिपिकल डॅड जोक असल्यासारखं वाटतंय.

या पोस्टला 1,241,572 हून अधिक लाइक्स मिळाले असून 2,260 जणांनी त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी बाप-लेकीच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केलाय तर काहींनी सचिनच्या विनोदबुद्धीला दाद दिली आहे.

एकानी म्हटलंय, "अजूनही तरुण दिसताय पाजी.” “बाप-लेकीचा अप्रतिम फोटो,”असं दुसरा म्हणतोय. तिसरा चाहता लिहितोय,"अप्रतिम फोटो" आणि "love you God," असंही एका चाहत्यानी म्हटलंय. सचिनच्या विनोदाची दखल घेत एका नेटिझननी लिहिलंय, “ही तर डॅड जोकची हाइट झाली.”

सचिननी पॅरासेलिंग करतानाचा त्याचा व्हिडिओही शेअर केला असून त्या पोस्टसोबत त्याने आपला पॅरासेलिंगसाठीचा उड्डाण करतानाचा अनुभव एका हिंदी गाण्यातून व्यक्त केला आहे. त्यानी लिहिलंय. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला आपल्याला रित्विझचं सुप्रसिद्ध हम उड गए हे गाणंही ऐकू येतं. कॅप्शनमध्ये त्यानी, “ ! #parasailing #adventure #watersports #instatravel” असंही लिहिलंय.

या सहलीत सचिनने सायकलिंग, गोल्फ आणि जलतरणाचाही आनंद लुटलाय. त्याने त्याचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुनसोबतचा त्याचा सेल्फीही शेअर केला आहे. त्यात दोघंही गॉगल घालून पोज देत आहेत. या फोटोची कॅप्शन आहे, “Vacation vibes."

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील महान बॅट्समन आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा नावे सर्वाधिक रन आणि शतकं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांत 18,426 तर कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 रन केल्या आहेत.

First published: December 12, 2020, 5:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या