sachin-tendulkar-meets-traffic-cop-suresh-dhumse-after-he-helped-former-cricketers-close-friend-following-a-road-accident-mhdoमुंबई, 21 डिसेंबर: दोन दिवसांपूर्वी, मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar ) आपल्या जवळच्या मित्राचे ट्रॅफिक पोलिसाच्या तत्परतेमुळे जीव वाचल्याने त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेऊन त्याचे आभार मानले. इतकेच नव्हे तर, त्याने भली मोठी पोस्ट शेअर त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेऊन त्याचे आभार मानले. त्याच्या या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनीदेखील खास ट्विट केले आहे. जे सध्या क्रिकेट जगतात व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सचिनचे आभाराचे ट्विट रिट्विट करत 'मास्टर ब्लास्टर मैदानावरील बेस्टमनला भेटला' असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
Master Blaster meets Bestman on Field.
.@sachin_rt met and applauded PC Suresh Dhumse whose timely response helped Mr. Tendulkar's friend get admitted to Nanavati Hospital after a road accident at Santacruz PStn Junction.#MumbaiPoliceForAll pic.twitter.com/isDXux0JoR — Mumbai Police (@MumbaiPolice) December 20, 2021
सांताक्रुझ येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिपाई सुरेश ढुमसे यांनी प्रसंगावधान दाखवून अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवळच्या मित्राला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे मित्राचे प्राण वाचले. त्यामुळे सचिनने स्वत: ढुमसे यांची त्यांच्या तत्परतेबद्दल आभार मानले होते. सचिनने या सुरेश ढुमसे यांची भेट घेतली. अशी माहितीही ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
'या व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे...' असे शिर्षक सचिननं या लेखाला दिले आहे. त्यामध्ये सचिन म्हणतो, 'काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या व्यक्तीचा गंभीर अपघात झाला. देवाच्या कृपेने आता तो बरा आहे. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे.
ट्रॅफिक पोलिसाने समयसूचकता दाखवली. त्याने तातडीने जखमी व्यक्तीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला आणखी त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मी त्या ट्रॅफिक पोलिसाला भेटलो. या सर्व मदतीबद्दल त्याचे आभार मानले.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police, Sachin tendulkar