India vs Pakistan: एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार, अब्दुल कादिरने सांगितली सचिनच्या त्या खेळीची आठवण

मैदानात काय झाले याचा खुलासा खुद्द कादिर यांनीच केला

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 01:26 PM IST

India vs Pakistan: एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार, अब्दुल कादिरने सांगितली सचिनच्या त्या खेळीची आठवण

आशिया चषक २०१८ सुरू झाला असून १९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेटर अब्दुल कादिर यांनी सचिन तेंडुलकरचा एक हटके किस्सा सांगितला. सचिनने १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्येच पाकिस्तानविरुद्ध त्यांनी पहिली कसोटी मालिका खेळली. पेशावरमध्ये खेळण्यात आलेल्या ३० ओव्हरच्या प्रदर्शनी सामन्यात अब्दुल कादिर यांनी सचिनला धावा करण्यासाठी प्रवृत्त केले. मग काय सचिनने कादिर यांच्या एकाच ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. हा किस्सा तर साऱ्यांनाच माहित आहे. पण मुळात मैदानात काय झाले याचा खुलासा खुद्द कादिर यांनीच केला.

पाकिस्तानचे माजी लेग स्पिनर कादिर म्हणाले की, ‘मी सचिनला कराचीमध्ये कसोटी सामना खेळताना पाहिले होते. तेव्हा वकार यूनिसच्या बॉलला तो फ्रंटफुटवर येऊन मारत होता. तेव्हापासून मी त्याचा चाहता झालो. जेव्हा आम्ही पेशावरला खेळायला उतरलो, तेव्हा श्रीकांतने माझ्या ओव्हरवर एकही धाव घेतली नाही. नॉन स्ट्राइकवर सचिन उभा होता.’ ‘ओव्हर संपल्यावर मी सचिनकडे गेलो आणि त्याला म्हणालो की, हा काही आंतरराष्ट्रीय सामना नाही. तू मला पुढील सामन्यात षटकार मारण्याचा प्रयत्न कर. यामुळे तुझंही नाव होईल.’ कादिर पुढे म्हणाले की, त्यावेळी सचिन काहीच बोलला नाही आणि पुढच्या ओव्हरमध्ये तो फलंदाजी करायला उभा राहिला.

यानंतर सचिनने कादिर यांच्या ओव्हरवर तीन षटकार लगावले. यानंतर मुश्ताक अहमदच्या एका ओव्हरमध्ये सचिनने चार षटकार लगावले. ‘मी सर्वशक्ती लावून सचिनला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण हे त्याचं कौशल्य होतं की त्याने मला षटकार लगावले.’

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...