मुंबई, 1 जून: जगभरातल्या भल्याभल्या बॉलर्सना (Ballers) फोडून काढणाऱ्या भारताच्या (India) मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यालाही एका बॉलरला तोंड देणं कठीण जायचं, त्याच्या बॉलिंगची (Balling) सचिनला भीती वाटायची असं सांगितलं, तर कोणाचाही विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. स्वतः सचिननेच याची काही वर्षापूर्वी कबुली दिली होती. हा बॉलर होता दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) हॅन्सी क्रोनिए (Hansi Cronje). खरं तर, जगातील असा कोणताही बॉलर नसेल ज्याच्या बॉलिंगला सचिननं तोंड दिलं नसेल. 24 वर्षांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, वसीम अक्रम, कोर्टनी वॉल्शसारख्या भल्या भल्या बॉलर्सनां सचिननं पाणी पाजलं; पण दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिएची बॉलिंग मात्र त्याला अतिशय त्रासदायक ठरायची.
हॅन्सी क्रोनिएनं सचिनला 32 वनडे मॅचमध्ये 3 वेळा तर 11 टेस्ट मॅचमध्ये 5 वेळा बाद केलं. हॅन्सी क्रोनिएची कारकीर्द कदाचित खूपच लहान असेल; पण त्यानं आपल्या खेळाच्या ताकदीवर जगातील बलाढ्य बॅटसमननां नामोहरम केलं होतं. अशा या खेळाडूची कारकीर्द क्रिकेट जगतातील धक्कादायक अशा मॅच फिक्सिंगमुळे (Match Fixing) संपुष्टात आली.
हॅन्सी क्रोनिएचा मृत्यूही (Death) अचानक झाला. 19 वर्षांपूर्वी विमान अपघातात (Plane Crash) त्याचं निधन झालं. सुमारे 21 वर्षांपूर्वी, क्रिकेट विश्वात मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानं मोठा भूकंप झाला. त्यात हॅन्सी क्रोनिएसारखी अनेक मोठी नावं पुढं आली. हॅन्सी क्रोनिएनं बुकींना माहिती देण्याची आणि मॅच फिक्स करण्याची कबुलीही दिली होती. या प्रकरणानंतर दोन वर्षांनंतर एक जून 2002 रोजी विमान अपघातात 32 वर्षीय हॅन्सी क्रोनिएचा मृत्यू झाला.
नवी सुरुवात अपूर्णच
खरंतर, क्रिकेटमधील कारकीर्द अशा रीतीनं संपुष्टात आल्यावर क्रोनिएने व्यवसायात स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. बिझनेस लीडरशीप विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि आयुष्यात दुसरा डाव सुरू करण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. दक्षिण आफ्रिकेसाठी 68 कसोटी आणि 188 वनडे मॅच खेळलेल्या हॅन्सी क्रोनिएनं 53 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केलं होतं. क्रिकेट विश्वात त्याचं नाव खूप मोठं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे व्यावस्थापकीय संचालक अली बाकर यांचा क्रोनिएच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास होता; परंतु फिक्सिंगच्या आरोपानंतर चार दिवसांनी क्रोनिएनं पहाटे 3 वाजता फोन करून त्यांना सांगितलं की तो प्रामाणिक नव्हता.
मृत्यूची भविष्यवाणी
काही वर्षांपूर्वी बीसीसीला (BCC) दिलेल्या एका मुलाखतीत हॅन्सी क्रोनिएचा मोठा भाऊ फ्रान्स यानं सांगितलं होतं की, दहा वर्ष आधीच हॅन्सी क्रोनिएला आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती. त्यानं एकदा म्हटलं होतं, आम्ही क्रिकेटसाठी बराच प्रवास करतो. कधी बसने तर कधी विमानाने. विमान अपघातात माझा मृत्यू होईल, असं मला वाटतं, असं हॅन्सीने आपल्याला सांगितल्याचं फ्रान्स म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sachin tendulkar