सचिनचा ‘मास्टर स्ट्रोक’ बदलणार वनडे क्रिकेटचा चेहरामोहरा!

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा, सचिनचा रोमांचक प्रस्ताव.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 06:02 PM IST

सचिनचा ‘मास्टर स्ट्रोक’ बदलणार वनडे क्रिकेटचा चेहरामोहरा!

मुंबई, 05 नोव्हेंबर : क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महान फलंदाज आजही एका क्रिकेटपटूचा दबदबा आहे. या क्रिकेटपटूचे नाव आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. तब्बल 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवल्यानंतर 2013मध्ये सचिननं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आता सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर सचिन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यासाठी मोठी भुमिका बजावू शकतो.

दरम्यान सचिननं आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवण्यासाठी एक अफलातून सल्ला दिला आहे. सचिननं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 डाव असले पाहिजे, असा सल्ला दिला. 50 ओव्हरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25-25 ओव्हरचे डाव खेळले जावे, असे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सचिननं सांगितले.

सध्याच्या काळात टी-20 आणि टी-10 सारख्या फॉरमॅटमुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली. त्यामुळं एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी सचिननं हा सल्ला दिला आहे. दरम्यान बीसीसीआय हा बदल करणार हे निश्चित झालेले नाही. सचिननं सौरव गांगुलीशी अद्याप याबाबत चर्चा केलेली नाही.

वाचा-IPLचे संघ जाणार अमेरिका दौऱ्यावर, मुंबई इंडियन्सचा अफलातून प्रस्ताव

25-25 ओव्हरचे 4 डाव

Loading...

सचिन तेंडुलकरनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, “50 ओव्हरच्या एका डावापेक्षा टॉस जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदा 25 ओव्हर फलंदाजीची संधी मिळेल. त्यानंतर दुसरा संघ 25 ओव्हर खेळेल. पुन्हा टीम ए 26व्या ओव्हरपासून फलंदाजीला सुरुवात करेल (किती विकेट बाकी असेल तेवढे). त्यानंतर टीम बी टीम एनं दिलेले टार्गेट चेस करेल. यात प्रत्येक 25 ओव्हरनंतर 15 मिनिटांचे ब्रके असेल.

वाचा-माही इज बॅक! ऐतिहासिक कसोटी सामन्यात दिसणार धोनीची झलक

एकदिवसीय क्रिकेटचा टी-20 अंदाज

कसोटी क्रिकेटच्या अंदाजात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25-25 ओव्हरचा सामना असेल. मात्र कसोटी क्रिकेटप्रमाणे यात 4 डाव असतील. याआधी 2009मध्ये सचिननं हा सल्ला दिला होता. मात्र बीसीसीआयनं हा प्रस्ताव मान्य केला नाही. दरम्यान आता सचिननं या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. येथे पहिला संघ दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या विकेट सुरक्षित ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करतील.

पॉवरप्लेच्या नियमांमध्ये होणार बदल

सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येक डावात पहिल्या 10 ओव्हर पॉवरप्लेचे असतात. पॉवरप्लेचे 5 ओव्हर फलंदाजीवर अवलंबुन असतात. मात्र सचिननं सुचवलेल्या फॉरमॅटमध्ये असे बदल होणार नाहीत. यामध्ये पहिल्या 5 ओव्हरमध्ये बॉलिंग पॉवरप्ले असेल. तर, 2 ओव्हर बॅटिंग पॉवरप्ले असेल.

वाचा-टीम इंडियाचा कर्णधार विराट पितो युरोपातलं पाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...