ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

निवृत्तीच्या दिवशी भारतरत्न मिळालेल्या सचिनला हॉल ऑफमध्ये 6 वर्षांनी स्थान मिळाले.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 12:59 PM IST

ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

लंडन, 19 जुलै : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सन्मान केला. तब्बल 24 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकरला आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले. त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली.

हॉल ऑफ फेमची घोषणा करताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले की, "सचिन, एलन आणि कॅथरीन यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. आमच्यासाठी ही गोष्ट सन्मानाची आहे". आयसीसीकडून तीनही खेळाडूंना शुभेच्छा. याआधी भारताच्या बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

आयसीसी हॉल ऑफ फेमच्या माध्यमातून क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या योगदानाची माहिती देऊन त्यांचा सन्मान करते. हॉल ऑफ फेमची सुरुवात आयसीसीने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोशिएशनच्या सहकार्यानं केली होती. सुरुवातीला यामध्ये 55 खेळाडू होते. आयसीसीच्या या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवीन खेळाडूंचा समावेश केला जातो. हॉल ऑफ फेममध्ये डब्ल्यू जी ग्रेस, ग्राहम गूच, बेरी रिचर्ड्स या दिग्गजांचा समावेश आहे.

Loading...

या कारणांमुळं उशीरा मिळाले स्थान

1989 साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिनला तब्बल 24 वर्षानंतर हा बहुमान मिळाला. त्याचे कारण म्हणजे Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन 5 वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. सचिननं 2013 साली नोव्हेंबर महिन्यात आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यामुळं सचिनला 5 वर्षांनी हा बहुमान मिळाला. त्यामुळे सचिनच्या आधी अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना या यादीत समाविष्ट केले होते. दरम्यान सध्या सोशल मीडियावर सचिनला उशीरा स्थान दिल्याची चर्चा आहे.

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...