टेस्ट क्रिकेटसाठी सचिननं दिला गुरूमंत्र, होऊ शकतात मोठे बदल!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अशेस मालिकेपासून टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 04:04 PM IST

टेस्ट क्रिकेटसाठी सचिननं दिला गुरूमंत्र, होऊ शकतात मोठे बदल!

मुंबई, 25 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अशेस मालिकेपासून टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात झाली. एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. आयसीसीनं हा सगळा खटाटोप कसोटी सामना रोमांचक करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरनं कसोटी सामने रंचक करण्यासाठी एक वेगळा पर्याय सांगितला आहे.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं एका कार्यक्रमात, कसोटी क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी काय करावे, हे सांगितले. सचिनच्या मते, कसोटी क्रिकेटसाठी मैदान हे 22 यॉर्ड्सचे असले पाहिजे. दरम्यान आपल्या मताचे समर्थन करताना सचिन म्हणाला की, “गेल्या आठवड्यात लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ज्या प्रकारचे मैदान तयार करण्यात आले होते, त्यामुळं स्मिथ आणि आर्चर यांच्यात चांगली स्पर्धा झाली”.

तसेच सचिननं, “कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे पिच असते. जर तुम्ही पिच चांगले देत असाल तर, खेळ रोमांचक होतो. गोलंदाजी चांगली होईल परिणामी फलंदाजांना बॅटिंग करण्यास मजा येईल. हेच लोकांना पाहायचे असते”, असे सांगितले. सचिन मुंबई हाफ मॅरेथॉनच्या कार्यक्रमात बोलत होता. तेंडुलकरनं 200 कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती पीचची. असे सांगितले.

वाचा-केएलनं घेतली मयंक अग्रवालची विकेट, या अनोख्या ‘पराक्रमा’चा व्हिडिओ एकदा पाहाच!

स्मिथ-आर्चर यांच्यातील स्पर्धा रोमांचक होती

Loading...

तेंडुलकरनं स्मिथनं लागलेल्या चेंडूबाबत विचारले असता, “स्मिथसोबत झालेला अपघात वाईट होता. त्यासाठी तो सर्वात मोठा झटका होता, मात्र याचमुळं कसोटी क्रिकेट रोमांचक होतो. आर्चरमुळं हा सामना रोमांचक झाला, एक वेळ असा होता की, सर्वांचे लक्ष अचानक टेस्ट क्रिकेटकडे वळले”, असे सांगितले.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.

वाचा-…म्हणून अश्विनला संघात जागा नाही, हरभजन सिंगनं सांगितलं खरं कारण

हे संघ घेणार भाग

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड हे संघ भाग घेतील. झिम्बाब्वे संघाला आयसीसीने निलंबित केल्यामुळे ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत.

टेस्ट चॅम्पियनसाठी असे आहेत निकष

या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल.

वाचा-IND vs WI, 1st Test, Day 3 : कोहली-रहाणेची जोडी जमली, भारताकडे 260 धावांची आघाडी

उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...