'या' दोन मुलींसाठी सचिननं मोडला स्वत:चाच नियम, पाहा काय केलं !

'या' दोन मुलींसाठी सचिननं मोडला स्वत:चाच नियम, पाहा काय केलं !

हे वाचून तुम्हाला नवल वाटेल पण सचिन हे केलं ते केवळ या मुलींना मदत व्हावी म्हणून.

  • Share this:

मुंबई, 04 मे : आपल्या फलंदाजीनं अनेकांना प्रेरणादायी देणारा आणि शेकडो विक्रमांवर आजही अधिराज्य गाजवणारा महान फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर. पण सचिनची ख्याती केवळ क्रिकेटच्या मैदानापुरती राहिली आहे, असे नाही. तर, आज सचिन त्याच्या समाज कार्यामुळंही तेवढाच प्रसिद्ध आहे. असाच एक प्रकार नुकताच घडला. यावेळी सचिननं चक्क एका महिलेकडून दाढी करुन घेतली. हे वाचून तुम्हाला नवल वाटेल पण सचिन हे केलं ते केवळ या मुलींना मदत व्हावी म्हणून.

दाढी करायची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर न्हावी येतो. मात्र उत्तर प्रदेशच्या दोन मुली 2014पासून दाडी करुन आपलं घर सांभाळत आहेत. ही गोष्ट आपल्याला नवीन वाटत असली तरी, या दोघींना दाढी करण्याची विशेष काही इच्छा नव्हती, मात्र घरच्या परिस्थितीमुळं त्यांच्यावर ही वेळ आली. मात्र, आपल्या वडिलांच्या आजारपणामुळं त्यांना उपजिविकेसाठी हा मार्ग निवडावा लागला.

जिलेट इंडिया यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये नेहा आणि ज्योती यांच्या आयुष्याची कहाणी सांगितली आहे. सुरुवातीला या महिला असल्यामुळं त्यांच्याकडं दाढी किंवा केस कापण्यासाठी कोणी जात नव्हतं. मात्र या जाहीरातीमुळं या दोघींची कहाणी आता घराघरात पोहचली आहे.

या जाहीरातीनंतर तर चक्क महान फलंदाजी सचिन तेंडुलकरनंही त्यांच्याकडून दाढी करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा फोटो त्यानं इन्साग्रामवर अपलोड केला आहे. एवढचं नाही तर, सचिननं त्यांना शिष्यवृत्तीही बहाल केली आहे.

ज्योती आणि नेहा यांच्यावर चित्रीत झालेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

First published: May 4, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading