हेल्मेट डालो भाई-सचिन तेंडुलकर

हेल्मेट डालो भाई-सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरनं दुचाकी स्वाराला कार थांबवून हेल्मेट घाला हा संदेश दिलाय

  • Share this:

09 एप्रिल : दुचाकी चालवताना हेल्मेट घाला असं वारंवार सांगितलं जातं.पण तरीही त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही.पण स्वत: सचिन तेंडुलकरनंच हे सांगितलं तर?

मास्टर ब्लास्टरनं एक चांगला संदेश रस्त्यात थांबून दिलाय.एका दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं नव्हतं.सचिननं कारमधून हे पाहिलं.त्यानं काच खाली करून काळजीपोटी त्याला झापलं. या चाहत्याचा मित्र बघा.आपला मित्र ओरडा खातोय आणि हे साहेब सेल्फी काढतायेत.

हे दोघं पुढे गेल्यावर सचिननं आणखी एकाला हेल्मेट घाला म्हणून सांगितलं.आज पहाटे सचिननं हा व्हिडिओ इंस्टाग्रॅमवर शेअर केला.

शहर कोणतंय ते कळत नाहीय पण दक्षिणेतलं शहर वाटतंय.कारण एका भिंतीवर कन्नड अक्षरं दिसतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 03:03 PM IST

ताज्या बातम्या