गोष्ट सचिनच्या पहिल्या शतकाची, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने 1994 मध्ये पहिलं शतक केलं. त्यानंतर सचिनने एकापाठोपाठ एक विक्रम रचले.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 04:36 PM IST

गोष्ट सचिनच्या पहिल्या शतकाची, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

मुंबई, 09 सप्टेंबर : क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर इतके विक्रम आहेत की ज्यांची बरोबरी करणं अशक्य मानलं जातं. सचिननं त्याच्या कारकिर्दीत शतकांचं शतक केलं आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचा हा विक्रम पाहता त्याला पहिलं शतक करण्यासाठी 5 वर्ष लागली होती हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पदार्पणानंतर सचिननं पहिलं एकदिवसीय शतक 1994 मध्ये केलं होतं.

1994 मध्ये लंकेत सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिननं पहिलं एकदिवसीय शतक केलं होतं. या मालिकेत भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. कोलंबोत झालेल्या या सामन्यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून मनोज प्रभाकर, सचिन तेंडुलकर सलामीला उतरले होते.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मनोज प्रभाकर 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर सचिनला अर्धशतकासाठी बराच वेळ झगडावं लागलं. त्यानंतर सचिननं धावगती वाढवली. एका बाजूनं लागोपाठ फलंदाज बाद होत असताना सचिन मैदानावर टिकून राहिला होता.

पदार्पणानंतर शतक करण्यासाठी सचिनला पाच वर्ष वाट पाहावी लागली होती. त्यानं पहिलं शतक 119 चेंडूत केलं. या सामन्यात सचिनने 130 चेंडूत 110 धावा केल्या. यात 8 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

सचिनच्या शतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकांत 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला 215 धावांत गुंडाळलं. भारतानं हा सामना 31 धावांनी जिंकला. या सामन्यात सचिनचा शतकांचा प्रवास सुरु झाला तो थेट 49 शतकांवर थांबला.

Loading...

'स्मिथ कितीही चांगला खेळलास तरी तुम तो धोकेबाज हो', क्रिकेटपटूनं केली टीका

बुमराहवर रबाडाची टीका, 'गोलंदाजी जबरदस्त पण...'

वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...