मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कोरोना काळात सचिन तेंडुलकरचं Mission Oxygen, मोठी मदत केली जाहीर

कोरोना काळात सचिन तेंडुलकरचं Mission Oxygen, मोठी मदत केली जाहीर

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानं 'Mission Oxygen' या मोहिमेसाठी 1 कोटींची मदत जाहीर केली आहे. ऑक्सिजनच्या अभावी तडफडून मरण पावणारे अनेक जीव वाचण्यात यामुळे वाचणार आहेत.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानं 'Mission Oxygen' या मोहिमेसाठी 1 कोटींची मदत जाहीर केली आहे. ऑक्सिजनच्या अभावी तडफडून मरण पावणारे अनेक जीव वाचण्यात यामुळे वाचणार आहेत.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानं 'Mission Oxygen' या मोहिमेसाठी 1 कोटींची मदत जाहीर केली आहे. ऑक्सिजनच्या अभावी तडफडून मरण पावणारे अनेक जीव वाचण्यात यामुळे वाचणार आहेत.

मुंबई, 29 एप्रिल: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सध्या संपूर्ण देश सामना करतोय. या महामारीमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी एकाच दिवसात सर्वात जास्त 3 लाख 79 हजार 257 जणांना लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या अवघड परिस्थितीमध्ये मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. क्रिकेट विश्वही त्याला अपवाद नाही. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानं 'Mission Oxygen' या मोहिमेसाठी 1 कोटींची मदत जाहीर केली आहे. ऑक्सिजनच्या अभावी तडफडून मरण पावणारे अनेक जीव यामुळे वाचणार आहेत.

सचिननं  दिल्लीतील 'मिशन ऑक्सिजन' या  एनजीओला ही मदत केली आहे. 250 पेक्षा जास्त युवा उद्योजकांनी ही मोहीम सुरु केली आहे. या निधीच्या माध्यमातून ते ऑक्सिजन सिलेंडर्स खरेदी करणार असून हॉस्पिटल्सना दान करणार आहेत. सचिन तेंडुलकरनं याबाबत ट्विट करत मदतीची घोषणा केली आहे. तसेच या एनजीओनं देखील या मदतीसाठी सचिनचे आभार मानले आहेत. सचिननं नेमकी किती मदत केली याचा आकडा जाहीर केला नसला तरी ही मदत 1 कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे.

क्रिकेट विश्वातून मदतीचा हात

"राजस्थान रॉयल्सकडून  Covid-19 ने प्रभावित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी मालक, खेळाडू आणि मॅनेजमेंटच्या मार्फत 1 मिलियन डॉलर म्हणजेच  7.5 कोटींची मदत जााहीर केली आहे. ही मदत राजस्थान रॉयल्स फाऊंडेश आणि ब्रिटीश एशियन ट्रस्टकडून देण्यात येईल.

'भारतामध्ये असुरक्षित वाटतं' या दाव्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचं 24 तासात घूमजाव!

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) देखील भारताच्या मदतीसाठी धावला आहे. ब्रेट लीने भारतातल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 1 बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठीच 50 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये पीएम केयर्स फंडसाठी दिले आहेत. कमिन्सने यासोबतच सहकारी खेळाडूंनाही मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Sachin tendulkar