मुंबई, 2 जानेवारी : सचिन तेंडुलकरचे आद्य गुरू आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
आरचरेक सरांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं होतं. शिवाय क्रीडा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसह अनेकांना त्यांनी क्रिकेटचे धडे दिले आणि अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेटपटू त्यातून घडले.
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ते क्रिकेट प्रशिक्षण देत असत. प्रशिक्षक म्हणून त्यांनी याच मैदानातून क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली होती. 1943 सालापासून ते क्रिकेट शिकवत आहेत.
रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरसह अजित आगरकर,विनोद कांबळे आणि प्रविण आम्रे यांचे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू नेहमीच रमाकांत आचरेकर सरांबद्दल आदर व्यक्त करतो.
गेल्या अनेक दिवसांपासून ते अंथरुणावर होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती.
ही बातमी अपडेट होत आहे.