• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'लवकर बरा हो मित्रा', क्रिकेटच्या देवाची या खेळाडूसाठी प्रार्थना

'लवकर बरा हो मित्रा', क्रिकेटच्या देवाची या खेळाडूसाठी प्रार्थना

सचिन तेंडुलकरची क्रिकेटपटूसाठी प्रार्थना

सचिन तेंडुलकरची क्रिकेटपटूसाठी प्रार्थना

न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर क्रिस केर्न्सचा (Chris Cairns) जीव तर वाचला आहे, पण त्याच्या पायाला लकवा मारला आहे. केर्न्सची ही अवस्था बघून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) दु:खी झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑगस्ट : न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर क्रिस केर्न्सचा (Chris Cairns) जीव तर वाचला आहे, पण त्याच्या पायाला लकवा मारला आहे. न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या रुग्णालयात दाखल आहे. हृदय विकाराचा धक्का लागल्यानंतर केर्न्सवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण स्पायनल स्ट्रोकमुळे केर्न्सच्या पायाला लकवा मारला, यामुळे त्याचे पाय चालणं बंद झालं आहे. क्रिस केर्न्सची ही अवस्था बघून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) दु:खी झाला आहे. केर्न्स लवकर बरा व्हावा, म्हणून सचिनने प्रार्थना केली आहे. 'क्रिस केर्न्सबाबत ऐकून दु:खी झालो आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. लवकर बरा हो मित्रा. क्रिकेटशी जोडले गेलेले सगळे तुझ्या लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत,' असं ट्वीट सचिनने केलं. सचिन आणि केर्न्स 2003 पर्यंत बराच काळ एकमेकांविरुद्ध खेळले. हे दोन्ही खेळाडू 28 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकमेकांसमोर आले. क्रिस केर्न्सने भारताविरुद्ध अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केर्न्सने सचिनला 2 वेळा वनडे आणि 2 वेळा टेस्टमध्ये असं एकूण 4 वेळा आऊट केलं. केर्न्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8,273 रन आहेत, याशिवाय त्याने 420 विकेटही घेतल्या. त्याने टेस्टमध्ये 5 आणि वनडेमध्ये 4 शतकं ठोकली. भारताविरुद्ध केर्न्सने 8 टेस्टमध्ये 34.27 च्या सरासरीने 377 रन केले, यामध्ये एक शतक आहे. याचसोबत त्याने 19 टेस्ट विकेटही घेतल्या. भारताविरुद्ध 32 वनडेमध्ये त्याने 34.91 च्या सरासरीने 838 रन केले आणि 3 शतकं ठोकली. याशिवाय त्याने 25 विकेटही मिळवल्या.
  Published by:Shreyas
  First published: