Home /News /sport /

'तुझ्याकडे फक्त एक आठवड्याचा वेळ', सचिनने कांबळीला दिलं चॅलेंज

'तुझ्याकडे फक्त एक आठवड्याचा वेळ', सचिनने कांबळीला दिलं चॅलेंज

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचा बालमित्र क्रिकेटपटू विनोद कांबळीला एक चॅलेंज दिलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी 28 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. गेल्या आठवड्यात सचिनने त्याचा बालमित्र क्रिकेटपटू विनोद कांबळीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्याने कांबळीला एक चॅलेंज दिलं आहे. हे चॅलेंज शतक करण्याचं किंवा क्रिकेटच्या मैदानावरचं नाही. सचिनने 2017 मध्ये एका गाणं गायलं होतं. क्रिकेट वाली बीट असं ते गाणं होतं. या गाण्याचं रॅप व्हर्जन एका आठवड्याच्या आत सादर कर असं आव्हान सचिनने कांबळीला दिलं आहे. सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने कांबळीला आव्हान दिलं आहे की, क्रिकेट वाली बीट या गाण्याचं रॅप व्हर्जन सादर कर. यासाठी सचिनने एक आठवड्याचा वेळ दिला आहे. सचिनला कांबळीकडून त्याच्या गाण्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना कांबळी म्हणाला की, हो गाणं आठवते. त्यावर सचिन म्हणाला की, मिस्टर कांबळी मी तुम्हाला या क्रिकेट वाली बीट गाण्याचं रॅप साँग तयार करण्याचं चॅलेंज देतो. यासाठी तुमच्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. म्हणजेच 28 जानेवारीपर्यंत ते ऐकवावं लागेल. कांबळीने सचिननं दिलेल्या चॅलेंजनंतर रॅपच्या अंदाजाच एक डान्सही केला. आता खरंच कांबळी हे चॅलेंज स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सचिनने दोन वर्षांपूर्वी क्रिकेट वाली बीट हे गाणं तयार केलं होतं. यामध्ये सचिनसोबत प्रसिद्ध गायक सोनू निगमसुद्धा होता. पाहा VIDEO : गोलंदाजाच्या डोक्यावरून उडी मारणं पडलं महागात, मैदानावरून पोहोचला हॉस्पिटलमध्ये
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Sachin tendulkar, Vinod kambli

    पुढील बातम्या