25 एप्रिल : सचिन सचिन,हॅपी बर्थ डे सचिन... वानखेडे स्टेडियमवर एकच नारा गुंजत होता. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट या मॅचच्या वेळी सचिन तेंडुलकरचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.2008 ते 2013 मध्ये सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेनटाॅर होता.
स्टेडियमवर सचिननं केक कापला. यावेळी आॅस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडननं सचिनसोबत खूप धमाल केली. आपण 44 वर्षांचे झालो, हे वाटतच नाही, असं सचिन म्हणाला.
सचिननं यावेळी आपल्या येणाऱ्या सिनेमाबद्दलही सांगितलं. शिवाय आयपीएल 10 वर्षांपूर्वी लाँच झालं, पण एवढी मोठी टुर्नामेंटस होईल, असं वाटलं नव्हतं, असंही म्हणाला.
सचिनच्या वाढदिवसाला क्रिकेटर्स,स्टार्स सगळ्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्यात.
VIDEO: @sachin_rt celebrates his Birthday at Wankhede stadium https://t.co/LQfJ4sbzY1 @HaydosTweets #MIvRPS
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा