News18 Lokmat

VIDEO : सचिन तेंडुलकर सांताक्लॉज बनतो तेव्हा...

सचिन तेंडुलकरने यंदाचा ख्रिसमस लहान मुलांच्यासोबत साजरा केला आहे. लहान मुलांना सरप्राईज देण्यासाठी सांताक्लॉज बनून एका चाईल्ड केअर सेंटरला त्याने भेट दिली.

News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2018 07:56 PM IST

VIDEO : सचिन तेंडुलकर सांताक्लॉज बनतो तेव्हा...

मुंबई, 25 डिसेंबर : देशामध्ये सगळीकडेच ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू आहे. प्रत्येक शहरातील रस्ते, चौक ख्रिसमसच्या झाडांनी सजले आहेत. सगळीकडे सांताक्लॉज फिरताना दिसत आहे. असाच एक सांताक्लॉज मुंबईमध्येही फिरताना दिसला आहे. हा सांताक्लॉज दुसरा कोणी नव्हे तर भारताचा क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहे.


सचिन तेंडुलकरने मुंबईतील एका लहान मुलांचं संगोपन करणारी संस्था 'आश्रय चाईल्ड केअर सेंटरला' भेट दिली. सांताक्लॉजच्या वेशभुषेत एका हातात बॅट आणि बॉल घेऊन तो तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत ख्रिसमस साजरा केला. मुलांना ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्या आनंदात सचिनने भर पाडली.


लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला सचिनला फार आवडतं. याआधीही त्याने मुंबईच्या रस्त्यावर सामान्य घरातील मुलांसोबत क्रिकेट खेळतं आनंद व्यक्त केला होता. त्याचा तो व्हिडिओ सोशल  मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. असाच एक व्हिडिओ आता सचिनने सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे.

Loading...


लहान मुलांसोबतचा हा व्हिडिओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर करत तो म्हणतो की, या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमुल्य आहे. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांसाठी मला हे करायला आवडेल. त्याचबरोबर त्याने भेटवस्तू म्हणूून मुलांना क्रिकेटच्या बॅट आणि खेळण्याच्या इतर वस्तू देत सोबतच त्याने लहान मुलांसोबत डान्स करत ख्रिसमस साजरा केला आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...