सचिन, लारा आणि ब्रेट ली पुन्हा मैदानात, भारतात होणाऱ्या या स्पर्धेत खेळणार!

sachin tendulkar - news18 lokmat

रायपूर येथे 2 ते 21 मार्च 2021 दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रसिद्ध क्रिकेटपटू Sachin Tendulkar, Brian Lara, Brett Lee अशे अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • Share this:
रायपुर, 25 जानेवारी : वर्ल्ड क्रिकेटमधील महान क्रिकेट (Cricket) खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघे दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार आहेत. सचिनसह ब्रेट ली (Brett Lee) ब्रायन लारा (Brian Lara) मुथैया मुरलीधरन आणि जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांसारखे दिग्गज देखील पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी या स्पर्धेला परवानगी दिली आहे. स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या सुनील गावस्कर (Sunil Gawaskar) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर या स्पर्धेला रायपूरमध्ये परवानगी देण्यात आली आहे. सचिन आणि लारा आदींसह माजी दिग्गज प्लेअर 2 ते 21 मार्चदरम्यान होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी-20 (Road Safety World Series)स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन 2 ते 21 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झालेले प्लेअर सहभागी होण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंनी रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवली आहे. या टी-20 स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने मंजुरीही दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या स्पर्धेला समर्थन दिले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतात टी-20 क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास आणखी मदत होईल, असं बीसीसीआयला वाटतं. हे देखील वाचा -  IPL 2021 : जयवर्धनेनंतर संगकाराची नवी इनिंग, आयपीएलच्या या टीममध्ये मोठी जबाबदारी सुनील गावस्कर (Sunil Gawaskar) यांची प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप या कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केलं आहे.  वायकॉम 18च्या कलर्स सिनेप्लेक्स या चॅनेलवर या मॅच दाखवण्यात येणार आहेत. वूट आणि जिओ या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर आहेत. या स्पर्धेच्या छत्तीसगड मधील आयोजनामुळे येथील पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. कोरोनाच्या कालखंडात संपूर्ण देशभरात क्रिकेटचे आयोजन करण्यात आलेलं नाही. कोरोनामुळे आयपीएलचे(IPL) आयोजन देखील युएईमध्ये (UAE) करण्यात आलं होतं. त्यामुळे शहरातील शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचे आयोजन होणार आहे. मुख्यमंत्री बघेल देखील या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहेत. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहेत.
Published by:Aditya Thube
First published: