सचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच

सचिन तेंडुलकरच्या हस्ते 'सचिन सागा क्रिकेट चॅम्पिन्सस' हा गेम लाँच केलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 10:10 PM IST

सचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच

07 डिसेंबर : मास्टर ब्लाॅस्टर सचिन तेंडुलकर सारखं आणि तेही सचिन बननून क्रिकेट खेळण्याची संधी तुमच्या 'हाती' चालून आली आहे. कारण बहुप्रतिक्षित 'सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स' गेम लाँच करण्यात आलाय.

अग्रणी डिजीटल एंटरटेनमेंट आणि गेमिंग कंपनी जेटसिंथेसिसने आज गुरुवारी सचिन तेंडुलकरच्या हस्ते  'सचिन सागा क्रिकेट चॅम्पिन्सस' हा गेम लाँच केलाय. या गेमचं वैशिष्टय असं की, तुम्ही सचिन होऊन सचिनने खेळलेल्या शानदार मॅचेसचा आनंद घेऊ शकतात.

सचिन सागा गेमसोबत क्रिकेट प्रेक्षकांचं मनोरंजन आणि क्रिकेटचा जवळून अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे. हा गेम खेळतांना तुम्हाला अनेक चॅलेंजस मिळतील जेणे करून तुम्हाला खेळाचा आनंद घेता येईल असं यावेळी सचिन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...