मुंबई, 8 मार्च- आज जागतिक महिला दिन आहे. जगभरात महिला दिन उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी विविध क्षेत्रात ठसा उमठविणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. अशातच क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरने देखील महिला दिनानिमित्त ‘बाईपण पण भारी देवा’ असं म्हणत एक खास पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
सचिन तेंडकरने ट्वीट करत म्हटलं आहे की, आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा असे मला नेहमी वाटते. तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे. ३० जूनला तुम्हीही ते खात्रीने अनुभवू शकता “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना…
वाचा-बिग बॉस फेम अर्चना गौतम संतापली, प्रियांका गांधींच्या पीएविरोधात पोलिसांत तक्रार
‘बाईपण पण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, स्त्रीत्वाचा बहुमान साजरा करणारी ही फिल्म येत्या ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. बाईपण भारी देवा ही अशा सहा बहिणींची गोष्ट आहे ज्यात प्रेम, माया, तडजोड, जिद्द, ध्येय, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचा खजिना आहे.
आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा असे मला नेहमी वाटते.
तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे. ३० जूनला तुम्हीही ते खात्रीने अनुभवू शकता “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना… १/२ — Sachin Tendulkar (@sachin_rt) March 8, 2023
स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, आणि तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करता करता, "थांब, जरा श्वास घे" म्हणत तिच्या कौशल्याला दाद देणारी ही कहाणी आहे.या सहा जणी जेव्हा नाईलाजास्तव म्हणा एकत्र येतात तेंव्हा त्यांच्याही नकळत त्यांच्या भूतकाळावर आणि वैयक्तिक संघर्षांवर मात करत असताना त्यांच्या मनाची, भावनांची होणारी घालमेल, उडणारा गोंधळ यांचा मजेदार प्रवास यात घडताना दिसतो.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, माधुरी भोसले निर्मित, बेला शिंदे आणि अजित भुरे सह-निर्मित, आणि केदार शिंदे द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Sachin tendulkar, Womens Day 2023