IPL 2019 : सचिन आणि गांगुलीची वानखेडेवर ग्रेट भेट

IPL 2019 : सचिन आणि गांगुलीची वानखेडेवर ग्रेट भेट

सचिन हा मुंबईकडून खेळत नसला तरी तो संघाचा आधारस्तंभ आहे. तर दुसरीकडे गांगुलीदेखील दिल्लीच्या संघाचा सल्लागार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : आयपीएलच्या 12व्या हंगामात क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारी डबल तडका पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडन गार्डन येथे कोलकता हैदराबाद यांच्यात सामना सुरू असून, दुसरा सामना मुंबई विरूध्द दिल्ली असा पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सामन्याआधी मैदानावर दोन महान खेळाडूंची ग्रेट भेट झाल्याचे पाहायला मिळाले.

एकेकाळी भारताला अनेक सामने जिंकून देणाऱ्या सचिन तेंडूलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने रविवारी वानखेडेवर एकमेकांची भेट घेतली. मात्र ही काही सदिच्छा भेट नव्हती, तर भारातसाठी एकत्र सामने जिंकूण देणारे हे दोन महान फलंदाज आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आज वानखेडेवर मुंबई विरुध्द दिल्ली असा सामना होत असताना, सचिन हा मुंबईकडून खेळत नसला तरी तो संघाचा आधारस्तंभ आहे. तर दुसरीकडे गांगुलीदेखील दिल्लीच्या संघाचा सल्लागार आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी सचिन आणि गांगुली यांची वानखेडेवर भेट झाली. दरम्यान, सचिन आणि गांगुली हात मिळवत असताना श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज महेला जयवर्धने याच्या चेहऱ्यावर काहीसे आश्चर्यकारक भाव पाहायला मिळाले.

आज मुंबई आणि दिल्लीत यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. तीन वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई संघ चौथ्यांदा आयपीएल जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने मैदानात उतरेल. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जलद गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांच्यावर असणार आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सचा युवा संघ यंदा दमदार कामगिरीसाठी उत्सुक आहे.तर, दिल्ली डेअरडेव्हिल्सवरून दिल्ली कॅपिटल्स असे नामकरण झालेल्या या नवीन संघाला यंदा शिखर धवनची साथ असणार आहे. तर, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्यासारख्या युवांवर विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे युवा फलंदाजांचा भरणा असलेल्या या संघाकडून चाहत्यांना जास्त अपेक्षा आहेत. मात्र वानखेडेवर मुंबई संघाचे पारडे जड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading