पुन्हा एकदा दिसणार ‘सचिन पर्व’, दिग्गजांविरुद्ध उतरणार टी-20च्या मैदानात

पुन्हा एकदा दिसणार ‘सचिन पर्व’, दिग्गजांविरुद्ध उतरणार टी-20च्या मैदानात

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी. सचिन, लारासह शेकडो दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा भारतात खेळणार क्रिकेट.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये 90च्या दशकापासून फक्त दोन नावे चाहत्यांच्या मनावर कोरली गेली होती. त्यातील एक नावं होतं कॅरेबियन किंग ब्रायन लारा तर दुसरा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. लारानं 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर, सचिननं 2013मध्ये. त्यामुळं त्या दिवसापासून क्रिकेट चाहते या दोन्ही दिग्गजांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू पुढच्या वर्षी होणाऱ्या रोड सेफ्टी जागतिक स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. ही एक टी-20 स्पर्धा असणार आहे. यात पाच देशांचे निवृत्त झालेले खेळाडू खेळताना दिसतील. यात भारता व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत.

वाचा-‘गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

भारतात 2 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विरेंद्र सेहवाग, तिलकरत्ने दिलशान आणि जॉंटी रॉर्ड्ससह अनेक दिग्गज माजी क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत.

सचिननं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक टी-20 सामना खेळला आहे. 46 वर्षीय सचिन कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. 24 वर्षांच्या करिअरमध्ये सचिननं 34 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात 100 शतकांचा समावेश आहे.

वाचा-बाप तसा बेटा! अर्जुन तेंडुलकरमुळे पालटलं 'या' गरीब मुलांच नशीब

नुकतेच बीसीसीआयनं या स्पर्धेसाठी परवानगी दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेमुळं भारतात टी-20ची लोकप्रियता वाढण्यात मदत होईल, असे अपेक्षा बीसीसीआयनं व्यक्त केली आहे. ही स्पर्धा म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी वेगळीच पर्वणी असणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी तिकीटांसंबधी माहिती जानेवारीमध्ये बीसीसीआयच्या वतीनं देण्यात येणार आहे.

वाचा-अरेरे! 150 ओव्हर केली फिल्डिंग पण बॅंटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर झाला आऊट

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

First published: October 16, 2019, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading