लॉकडाऊनमध्ये सचिनला आईने दिलं खास बर्थ डे गिफ्ट, पाहा PHOTO

लॉकडाऊनमध्ये सचिनला आईने दिलं खास बर्थ डे गिफ्ट, पाहा PHOTO

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने वाढदिवसाची सुरुवात आईचे आशिर्वाद घेऊन केली. यावेळी सचिनला आईने खास गिफ्टही दिलं. सचिनने सर्वात आधी आईचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला. सचिनने त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाशी लढा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं. लॉकडाऊमुळे सचिन वाढदिवशी त्याच्या घरच्या लोकांसोबतच आहे.

वाढदिवसानिमित्त सचिनने सकाळी पहिल्यांदा आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्याला आईने एक खास गिफ्ट दिलं. लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या सचिनला आईने गणपतीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. हा गणपतीचा फोटोच आपलं गिफ्ट असल्याचं सचिनने ट्विटरवर म्हटलं आहे.

सचिनने एका मुलाखतीत म्हटलं होतं की,'लॉकडाऊनमुळे त्याला घरच्या लोकांसोबत वेळ घालवायला मिळत आहे. याकाळात तो घरच्या कामात मदत करत आहे. यात जेवण बनवणं, घराची साफ सफाई आणि झाडांना पाणी देण्याचं कामही करत आहे.'

हे वाचा : कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत

मुलांना घरात राहणं कठीण आहे कारण नेहमीच त्यांना मित्रांसोबत रहायला, फिरायला आवडतं असं सचिनने सांगितलं. लॉकडाऊनने त्याला आणि पत्नी अंजलीला दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी दिली. या परिस्थितीत सचिनची आईसुद्धा त्याच्यासोबत वेळ घालवत आहे.

हे वाचा : 15 कोटींच्या गाड्यांचा मालक असूनही सचिनने विकली नाही 2 लाखांची 'ती' गाडी

संपादन - सूरज यादव

First published: April 24, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या